Arnab Goswami in Maharashtra Police Custody: अर्नब गोस्वामी अटक प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया

त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Arnab Goswami | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रिपब्लिक टीवी (Republic TV) संपादक गोस्वामी (Arnab Goswami) यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या अटक प्रकरणानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्यापासून ते प्रकाश जावेडकर (Prakash Javadekar), चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis,) आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्नब गोस्वामी याच्या अटकेनंतर भाजप चांगलाच आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

काँग्रेस आणि सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा लोकशाहीवर हल्ला- अमित शाह

रिपब्लिक टीव्ही आणि अर्नब गोस्वामी यांच्या विरोधात सत्तेचा दुरुपयोग करत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्तेचा दुरुपयोग केला आहे. ही घटना आणबाणीची आठवण करुन देत आहे. काँग्रेसची ही पहिल्यापासूनची सवय आहे. जे विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात आवाज दाबण्यासाठी कारवाई करायची. काँग्रेसने पूर्वीपासूनच लोकशाहीचा गळा घोटला आहे. आणिबाणी हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. जेव्हा विरोधक बोलतात तेव्हा त्यांना अडचणी आणले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काँग्रेसच्या तोंडी शोभत नाही. (हेही वाचा, रिपल्बिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.)

गप्प बसणारे दडपशाहीचे समर्थक- स्मृती इरानी

अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर जे गप्प बसतील ते दडपशाहीचे समर्थक आहेत. ते हुकुमसाहीचे समर्थन करतात. जर तुम्ही या अटकेचा विरोध करत नाही, तर तुम्ही या अटकेचे समर्थन करता असा त्याचा अर्थ होतो, असे केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी म्हटले आहे.

हे अत्यंत गंभीर आणि निंदयनी आहे- रविशंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वरिष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांची अटक ही गंभीर आणि चिंताजनक आहे. आम्ही 1975 मध्ये आणिबाणीचा विरोध करुन प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची लढाई लढली होती.

आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम- देवेंद्र फडणवीस

आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

रिपल्बिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 या दिवशी आत्महत्या केली होती. अलिबाग येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता.