आंध्रप्रदेश सरकारच्या 3 राजधानी निर्मिती निर्णयाला स्थनिकांचा विरोध; कृष्णा नदीच्या पाण्यात उतरून केले आंदोलन,पहा व्हिडीओ

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारच्या राज्यात 3 राजधान्या निर्माण करण्याच्या विधेयकाला मंजुरी मिळताच स्थानिकांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता, आज 28 जानेवारी रोजी सुद्धा यासंदर्भात रायपूडी येथील स्थानिकांनी कृष्णा नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले.

People Protesting In Krishna River (Photo Credits: ANI)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारच्या राज्यात 3 राजधान्या निर्माण करण्याच्या विधेयकाला मंजुरी मिळताच स्थानिकांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता, आज 28 जानेवारी रोजी सुद्धा यासंदर्भात रायपूडी येथील स्थानिकांनी कृष्णा नदीच्या (Krishna River) पाण्यात उतरून आंदोलन केले. सरकारने तीन राजधान्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी यान आंदोलनकर्त्यांची मागणी आह. या मध्ये महिला पुरुष व वृद्ध व्यक्ती देखील हातात काळे झेंडे व तिरंग घेउन  पाण्यात उतरले होते. तर दुसरीकडे आंध्रप्रदेश सरकारकडून तीन राजधान्यांचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी केंद्र सरकार कडे धाडण्यात आला आहे. यास मंजुरी मिळताच, येत्या काळात 'कुरनूल', (Kurnool) 'विशाखापट्टनम' (Visakhapatnam) आणि 'अमरावती', (Amaravati) अशा तीन राजधानी असणारे आंध्र प्रदेश हे एकमेव राज्य ठरणार आहे. (आंध्र प्रदेशच्या आता 3 राजधान्या; मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधेयकाला मंजुरी)

प्राप्त माहितीनुसार, आंध्र प्रदेशची प्रशासकीय कार्यकारी राजधानी 'विशाखापट्टनम' करणे तर 'अमरावती' ही विधिमंडळ आणि 'कुरनूल' ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असावी असा हा प्रस्ताव आहे, ज्याला 21 जानेवारी रोजी राज्य विधिमंडयात मंजुरी मिळाली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, हे विधेयक विधिमंडळात सादर होत असतानाच याला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता स्थानिक सुद्धा या निर्णयाच्या विरुद्ध आहेत, मात्र कामाच्या अनुषंगाने हा निर्णय महत्वाचं असल्याचे म्हणत आंध्र प्रदेश सरकार या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद