Srinagar Encounter: जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; CRPF चे 2 जवान जखमी
या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. श्रीनगरच्या बटमालू परिसरात ही चकमक उडाली. पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांना प्रतिकार केला. अद्यापही दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील श्रीनगर (Srinagar) येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या बटमालू (Batamaloo) परिसरात ही चकमक उडाली. पोलिस (Police) आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांना प्रतिकार केला. अद्यापही दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. (Jaish-e-Mohammad Terrorist Arrested: जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा येथुन जैश-ए- मोहम्मद च्या दोन दहशतवाद्यांंना 7 लाख रुपयांंसह अटक)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी घुसल्याची सूचना मिळताच पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी बटमालू मधील फिरदौसबाद (Firdousabad) परिसराला सुमारे 2.30 तास घेराव घालून शोध मोहिम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्त्युतर देण्यासाठी भारतीय सैन्याकडूनही गोळीबार करण्यात आला. त्यानंतर एकच चकमक उडाली आणि यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर सीआरपीएफचे 2 जवान जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यात या चकमकीत एका महिलेचा देखील मृत्यू झाला.
ANI Tweet:
केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, यावर्षी मार्च ते ऑगस्ट दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांकडून तब्बल 138 दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर 50 जवान शहीद झाले. जुलै महिन्यापर्यंत पाकिस्तानकडून 47 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. तर ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 दरम्यान पाकिस्तानकडून 176 वेळा सीमाउल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी 111 वेळा ते यशस्वी झाले. दरम्यान, दहशतवादा विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीचा (Zero-Tolerance Policy) सरकारने स्वीकार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.