Amit Shah COVID-19 Test: अमित शाह कोरोना मुक्त झाल्याचे मनोज तिवारी यांचे ट्विट; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (MHA) अधिकार्यांनी ANI या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांंनी कोरोनावर मात केल्याची माहिती देणारे भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचे ट्विट चुकीचे असुन अद्याप शाह यांची कोरोना चाचणी घेण्यात आली नसल्याचे समजत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (MHA) अधिकार्यांनी ANI या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणुन केलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते मात्र शाह यांची प्रकृती स्थिर होती, तरीही सुरक्षिततेचा पर्याय म्हणुन त्यांना दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. Amit Shah Tested Negative COVID-19: केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांंची कोरोनावर मात, मनोज तिवारी यांची ट्विट मधुन माहिती
काही वेळापुर्वी भाजप खासदार मनोज तिवारी यांनी ट्विट करुन अमित शाह यांंची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते, यावर अमित शाह यांच्याकडुन दुजोरा देण्यात आला नव्हता आणि आता केंद्रीय गृहमंंत्रालयातील अधिकार्यांनी सुद्धा अद्याप शाह यांची कोरोना चाचणी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. असंं असलं तरी शाह यांची प्रकृती स्थिर असुन ते औषध उपचारांंना चांंगला प्रतिसाद देत आहेत असेही समजत आहे.
ANI ट्विट
अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर कर्नाटकचे मुख्यमंंत्री व भाजप नेते बी.एस.येदियुरप्पा यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली होती .तर केंद्रीय मंंत्री रवी शंंकर प्रसाद यांनी सुद्धा स्वतःला घरात Qurantine करुन घेतले होते.