महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळी झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या सचिव पूजा पांडेय पतीसह अटकेत

महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी गांधींच्या पुतळ्याला गोळी झाडणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडे (Photo Credits: Twitter)

महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुण्यतिथी दिवशी गांधींच्या पुतळ्याला गोळी झाडणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेच्या (Akhil Bharatiya Hindu Mahasabha) राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय (Pooja pandey) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूजा यांच्यासह पती अशोक पांडेय (Ashok Pandey) यांना देखील अटक करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिल्लीतून नोएडा येथे प्रवेश करताना दोघांना अटक केली. आता दोघांनाही अलिगड येथे नेण्यात येईल. आज अलिगड पोलिस पूजा आणि अशोक पांडेय यांना न्यायालयासमोर सादर करतील. (गांधींजींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून अखिल भारत हिंदू महासभेने साजरी केली 71 वी महात्मा गांधी पुण्यतिथी, 'नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणा)

गांधींच्या पुण्यतिथी दिवशी गांधी पुतळ्याला गोळ्या घातल्याप्रकरणी 13 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

30 जानेवारी दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. या दिवशी नथुराम गोडसे यांनी गांधी हत्या केली. त्यामुळे गोडसे यांच्या आठवणीत हिंदू महासभेकडून हा दिवस 'शौर्य दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने पूजा पांडे यांनी गांधींच्या पुतळ्याला तीन गोळ्या झाडून गांधी पुण्यतिथी साजरी करण्याचा विकृत प्रकार केला.

हा घटनेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत पूजा पांडे यांच्यासह मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान देखील दिसत आहेत.