Air India च्या तिकीट बुकींगला सुरुवात; IndiGo, विस्तारा या खाजगी कंपन्याही लवकरच सुरु करणार तिकीट बुकींग सुविधा
त्यानंतर आजपासून एअर इंडियाच्या तिकीट बुकींगला सुरुवात झाली असल्याची माहिती एअर इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केले. त्यानंतर आजपासून एअर इंडियाच्या तिकीट बुकींगला सुरुवात झाली असल्याची माहिती एअर इंडियाने (Air India) ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काल (21 मे) रोजी नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन महिन्यांनंतर सुरु होणाऱ्या विमानसेवेच्या 383 मार्गांची माहिती दिली. तसंच प्रवास तिकीट दर यांसह इतर महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली. (मुंबई-दिल्ली तिकीट दर पुढील 3 महिन्यांसाठी कमाल 10,000 रूपये; 25 मे पासून सुरू होणार्या विमान प्रवासाच्या Airfare बाबत नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली माहिती)
विमान तिकीट बुकींग सुरु झाल्याचे एअर इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. "गुड न्यूज! देशांतर्गत विमान प्रवास तिकीटाचे बुकींग आजपासून सुरु झाले आहे." तिकीट बुक करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. किंवा अधिकृत एजंटकडून तिकीट बुक करून घ्या असे सांगण्यात आले आहे. तसंच एअर इंडियाच्या ऑफिसेसमध्येही तिकीट बुकींग सुरु आहे. कस्टमर केअरला (Customer Care) कॉल करुन तुम्ही यासंबंधित अधिक माहिती मिळवू शकता.
Air India Tweet:
एअर इंडियाने तिकीट बुकींग सुरु केल्यानंतर अनेक खाजगी विमान कंपन्यांनी तिकीट बुकींगला सुरुवात करणार आहेत. लवकरच इंडिगो (IndiaGo), गो एअर (GoAir), विस्तारा (Vistara) या कंपन्यांचे तिकीट बुकींगही सरु होणार आहे. IndiGo 25 मे पासून तिकीट बुकींगला सुरुवात करणार असून विस्तारा आणि गो एअर कंपनी 1 जूनपासून तिकीट बुकींग सुरु करणार आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विशेष खबरदारी घेत विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान केबिन क्रु मेंबर्संना सर्व प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरणे आवश्यकआहे. त्याचबरोबर एका प्रवाशाला एकच बॅग चेक इन साठी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. विमान उड्डाणाच्या 2 तास आधी प्रवाशांनी विमानतळावर हजर होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असणार आहे, असे नियम लागू करण्यात आले आहेत.