Muzaffarnagar Accident: ट्रकची दुचाकीला धडक, वाहनाला आग लागल्याने दोन पोलिसाचा होरपळून मृत्यू, चालक घटनास्थळावरून फरार
उत्तर प्रदेशातील मुझ्झाफिरनगरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका ओव्हरलोड ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात युपी पोलिस जोडप्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
Muzaffarnagar Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझ्झाफिरनगरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका ओव्हरलोड ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात युपी पोलिस जोडप्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मुझ्झफरनगर पोलिसांना १२ ऑगस्ट रात्री ८.३० च्या दरम्यान ही माहिती मिळली. अपघातात दुचाकीसह दोघे जण होरपळले अशी माहिती पोलिसांंनी दिली. (हेही वाचा- Agra Shopping Mall Accident Video: शॉपिंग मॉलमध्ये पार्किंग परिसरात चिमुकल्या मुलीचा भीषण अपघात, आग्रा येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबाद पोलिस ठाण्याचे पोलिस सुधीर आणि सोनिया या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. ट्रक भरधाव वेगात येत होता आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी ट्रकच्या खाली आला. ट्रकला जागीचा आग लागली. आग लागल्यामुळे पोलिस हवालदार सुधीर आणि सोनिया दोघे ही होरपळून मरण पावले. ट्रक चालकाने वेळीच धाव घटनास्थळावरून धाव घेतला.
अपघातात एकाच पोलिस ठाण्यातील दोघे मरण पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतला. ट्रक खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. अपघाताचे नेमकं कारण पोलिस शोधत आहे. अपघात झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुजफ्फरनगर में बड़ा हादसा, हादसे के बाद ट्रक में लगी आग, दो की मौत की सूचना,मृतक बाइक सवार उत्तर प्रदेश पुलिस का सिपाही था,हादसे में बाइक सवार पति-पत्नी की दर्दनाक मौत,@muzafarnagarpol @Uppolice pic.twitter.com/C6Z7xpA48h
— Anuj Tyagi (@AnujTyagi8171) August 13, 2024
आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग विझवण्यात आल्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2024 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

