Drunk Man Sets Fire at Petrol Pump: मद्यधुंद तरुणाने लावली पैज; डेअर चॅलेंजनंतर लावली पेट्रोल पंपाला आग; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी आगीचा भडका उडाला त्यावेळी पेट्रोल पंपावर एक महिला आपल्या मुलीसह उभी होती. आगीनंतर येथे उभा असलेली अल्पवयीन मुलगी थोडक्यात बचावल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Drunk Man Sets Fire At Petrol Pump: हैदराबाद (Hyderabad) च्या नाचाराम भागातील (Nacharam Area) पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दारूच्या नशेत असणाऱ्या व्यक्तीने (Drunk Man) पेट्रोल पंपाला आग (Fire) लावली. चिरन असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या व्यक्तीला अटक केली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खबराट पसरली. अधिका-यांनी सांगितले की, चिरन पेट्रोल पंपावर नशेच्या नशेत पोहोचला. यावेळी त्याच्याजवळ सिगारेट पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर होते.
प्राप्त माहितीनुसार, चिरनचा मित्र अरुण याने त्याला हिंमत असेल तर पेट्रोल टाकताना लायटर लावण्याचे चॅलेंज दिले. त्यानंतर चिरने हे चॅलेंज स्विकारले. स्कूटरमध्ये इंधन टाकत असताना चिरनने लायटर लावला. यानंतर आगीचा भडका उडाला. त्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या लोकांनी आगीपासून वाचण्यासाठी धाव घेतली. (हेही वाचा -Thailand Bus Fire: टायर फुटल्याने सहलीला निघालेल्या बसला आग; 44 पैकी 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू)
आग लागली तेव्हा कर्मचाऱ्यांसह सुमारे 10 ते 11 जण पेट्रोल पंपावर होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी आगीचा भडका उडाला त्यावेळी पेट्रोल पंपावर एक महिला आपल्या मुलीसह उभी होती. आगीनंतर येथे उभा असलेली अल्पवयीन मुलगी थोडक्यात बचावल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Fire Engulfs Library In Pune: पुण्यातील नवी पेठ परिसरातील वाचनालयाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ)
मद्यधुंद व्यक्तीने डेअर चॅलेंजनंतर लावली पेट्रोल पंपाला आग, पहा व्हिडिओ -
दरम्यान, चिरण आणि अरुण या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आग आणि स्फोटकांचा गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नचाराम पोलिसांचे इन्स्पेक्टर जी. रुदवीर कुमार यांनी परिस्थितीच्या गंभीरतेवर भर देत सांगितले की, अशा बेपर्वा वर्तनामुळे गर्दीच्या ठिकाणी मोठा स्फोट होऊ शकतो. या दोन्ही व्यक्तींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात हजर केले जाईल.