Pushpa 2 Stampede: आईच्या मृत्यूनंतर संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंग दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित

10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली.

9-year-old boy declared brain dead (फोटो सौजन्य - X/@11monikaSingh)

Pushpa 2 Stampede: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत (Sandhya Theater Stampede) एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांचा 9 वर्षाचा मुलगा या घटनेत गंभीर जखमी झाला होता. 4 डिसेंबरपासून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठा अपडेट समोर आले आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असून श्वासोच्छवासाच्या अभावामुळे त्याचा मेंदू मृत (Brain Dead) घोषित करण्यात आला आहे. मुलाच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत कोणतीही दृश्यमान सुधारणा नाही. त्यामुळे हा मुलगा व्हेटिंलेटरवर आहे. त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यासाठी ट्रॅकोस्टोमीचा विचार सुरू आहे.

अल्लू अर्जुनचा छोटा फॅन व्हेंटिलेटरवर -

मंगळवारी, हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद, तेलंगणा सरकारच्या आरोग्य सचिव डॉ क्रिस्टीना आयएएस यांनी तेलंगणा सरकारच्या वतीने KIMS हॉस्पिटलला भेट देऊन 9 वर्षांच्या मुलाची विचारपूस केली. हैदराबाद शहर पोलिसांनी X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केलेल्या पोस्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना कळवले आहे की, मुलावर व्हेंटिलेटर सपोर्टवर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, श्रीमान तेजाच्या प्रकृतीबाबत डॉक्टर लवकरच वैद्यकीय बुलेटिन जारी करतील. आरोग्य सचिव डॉ. क्रिस्टीना यांनी सांगितले की, आम्ही श्री तेजाच्या प्रकृतीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहोत. तो लवकर बरे होण्याची आशा आहे. (हेही वाचा -Pushpa 2 Premiere Tragedy: हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्री तेज यांच्याबाबत अल्लू अर्जुनचे वक्तव्य, म्हणाले- 'मी त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत आहे')

काय आहे नेमक प्रकरण?

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तेजा या 9 वर्षांच्या मुलाला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली. दरम्यान, हैदराबाद शहराचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी हॉस्पिटलला भेट दिली, त्यानंतर त्यांनी सांगितले की 9 वर्षीय श्री तेजा हा श्वासोच्छवासाच्या कमतरतेमुळे ब्रेन डेड झाला आहे. त्यांला बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल.

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक -

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पुष्पा 2 स्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती आणि तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. नंतर, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर जखमी मुलाबद्दल चिंता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली, जिथे त्याने हे देखील उघड केले की, चालू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे त्याला रुग्णालयात भेट न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसह सर्वतोपरी मदत करणार असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, 4 डिसेंबर रोजी, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये मध्यरात्रीच्या प्रीमियर दरम्यान एक भयानक घटना घडली. अल्लू अर्जुन अचानक संध्या थिअटरमध्ये पोहोचल्यानंतर चाहत्यांची मोठी गर्दी झाली आणि काही सेकंदातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानतंर याठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.