7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचार्‍यांसाठी गूड न्यूज; Travelling Allowance सादर करण्यासाठी कालमर्यादेत वाढ

एका रिपोर्ट अनुसार, केंद्र सरकारचा हा निर्णय

रुपया (Photo Credits: PTI)

कोविड 19 संकट काळामध्ये आता केंद्र सरकारने पेन्शन संबंधी नियम देखील अधिक सोप्पे केले आहेत. यामध्ये आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी सरकारने अजून एक नवा निर्णय घेतला आहे. आता सरकारच्या नव्या नियमांनुसार, रिटायर्टमेंट मध्ये Travelling Allowance जमा करण्यासाठी कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता निवृत्तीनंतर टीए क्लेम जमा करण्यासाठी देखील वेळ वाढवून देण्यात आला आहे. तुमच्या ट्रॅव्हलिंग नंतर 180 दिवसांमध्ये जमा करण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो यापूर्वी ही कालमर्यादा 60 दिवसांची होती. 7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ होण्याआधीच 'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट.

काही विशेष कारणांसाठी जर सरकारी कर्मचारी टूर, ट्रांसफर किंवा प्रशिक्षणासाठी गेल्यास टीए क्लेम केला जातो. 2018 मध्ये सरकारने टूर, ट्रांसफर, प्रशिक्षण किंवा रिटायर झाल्यानंतर प्रवास भत्ता सादर करण्याची सीमा 1 वर्षांवरून 60 दिवस केली होती.

एका रिपोर्ट अनुसार, केंद्र सरकारचा हा निर्णय निवृत्त झालेल्यांसाठी चांगला सिद्ध नाही झाला. त्यांना घाईत प्रवास झाल्यानंतर 60 दिवसांतच त्यांच्या टीए रिएम्बर्स करण्यासाठी अर्ज करावा लागत होता. पण आता नव्या नियमांनुसार 60 दिवसांवरून तो 180 दिवस म्हणजेच सहा महिने करण्यात आला आहे. Ministry of Finance च्या अंतर्गत असलेल्या Department of Expenditure ने तसे Office Memorandum जारी केले आहे.