7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स यांना DA, DR Arrears बाबत मिळू शकते गूड न्यूज; PM Narendra Modi लवकरच घेणार अंतिम निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यावधी कर्मचार्‍यांना येत्या दिवाळी, दसरा आणि न्यू इयरच्या तोंडावर आनंदाची बातमी देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

सातव्या वेतन आयोगानुसार पगार घेणार्‍या केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) आणि वेतनधारकांना (Pensioners) लवकरच मोदी सरकार DA आणि DR बाबत गूड न्यूज देणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्स त्यांच्या थकीत DA आणि DR बाबत प्रतिक्षेत आहेत. त्यांची याबाबतची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापर्यंत पोहचली आहे. पुढे नरेंद्र मोदी आता यावर निर्णय घेणार आहेत. जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर करोडो नोकरदार आणि निवृत्तीधारकांना एक मोठी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे.

1 जुलैपासून केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचार्‍यांचा डीए, डीआर चा दर 28% केला आहे. दरम्यान कोरोना संकटाकाळात केंद्र सरकारने महागाई भत्ता जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 साठी गोठवला होता. मात्र जुलै पासून तो 17% वरून 28 % करण्याचा निर्णय झाला आहे. नक्की वाचा: 7th Pay Commission Update News: डीएमध्ये वाढीनंतर केंद्र सरकारचा अजून एक मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 'या' योजनेच्या मुदतीत केली वाढ .

महागाई भत्ता 17% वरून 28% करताना सरकारने मध्यंतरीच्या काळातील एरिअर्स देण्यास नकार दिला होता. दरम्यान सरकार सोबत या महागाई भत्ता बाबत वाटाघाटी करताना JCM secretary Shiv Gopal Mishra,यांनी केंद्र सरकारचा अ‍ॅरिअर्स न देण्याचा निर्णय हा "illogical" असल्याचं म्हटलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यावधी कर्मचार्‍यांना येत्या दिवाळी, दसरा आणि न्यू इयरच्या तोंडावर आनंदाची बातमी देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.