7th Pay Commission: केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार रात्रपाळी भत्ता, 'हे' आहेत नवे नियम

केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

7th Pay Commission (File Image)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारतर्फे केंद्र सरकारच्या (Central Government Employee) कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) याबाबत निर्देश जारी केले आहे. हा नियम 13 जुलै रोजी जारी करण्यात आला असला तरी त्यांची अंमलबजावणी 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.यापूर्वी रात्रपाळी भत्ता हा विशेष ग्रेड पेवर आधारित दिला जायचा.7th Pay Commission: कोरोना व्हायरस संकटामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागणीचा निर्णय अधांतरी; सरकारकडून लवकर निर्णय होण्याची शक्यता कमी

रात्रपाळी भत्ता देण्यासाठी सरकारतर्फे काही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, नाइट वेटेजच्या आधारावर कामाचे तास मोजले जाणार आहे. रात्रीच्या वेळी केलेलं काम हे तासाला 10  मिनिट वेटेजच्या हिशेबाने मोजलं जाईल असे सांगण्यात आले आहे. नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेच्या आधारावर एक मर्यादा ठरवली जाईल. कार्मिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेची मर्यादा ही 43 हजार 600 रुपये प्रती महिना या आधारावर ठरवली आहे. अलाउंस तासाच्या हिशेबाने कर्मचाऱ्यांना देणार आहे. हा हिशेब बीपी (बेसिक पेमेंट) + डीए (डिअर अलाउन्स) /200या आधारने करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारद्वारे नियमावलीत ड्युटीचे तास सुद्धा विशेष नमूद करण्यात आले आहेत. रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान कामालाच नाईट ड्युटी समजलं जाईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.हे नवे नियम सर्व मंत्रालये आणि विभागांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे.