7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA मध्येही होणार वाढ
7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. महागाई भत्त्यातील वाढीच्या घोषणेनंतर आता घरभाडे भत्ता देखील वाढवण्यात येणार आहे
7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतन मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढीच्या घोषणेनंतर आता घरभाडे भत्ता (House rent allowance) देखील वाढवण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून एचआरए मध्ये 1-3 टक्क्यांची वाढ होणार आहे. ही वाढ वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळी असेल. 1 जुलै पासून वाढणारा महागाई भत्त्यासोबत ही वाढ देखील झाली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. डीएनएच्या रिपोर्टनुसार, खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे जाईल आणि घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होईल, असे आदेश जारी केले होते. 1 जुलै 2017 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील बदलला जाईल. (7th Pay Commission Latest News Today: केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता आता 28%; पहा त्यामुळे पगारात नेमकी कशी वाढ होणार?)
X क्लास शहरांमध्ये राहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक पे च्या 27 टक्के एचआरए मिळेल, Y क्लास शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18% तर Z क्लास शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. सध्या X शहरातील कर्मचाऱ्यांना 24 टक्के, Y शहरातील कर्मचाऱ्यांना 16 टक्के आणि Z शहरातील कर्मचाऱ्यांना 8 टक्के एचआरए मिळत होता.
ज्या शहरातील लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त आहे, अशी शहरं X क्लास कॅटेगरीत मोडतात. 5 ते 50 लाख लोकसंख्या असलेली शहरं Y क्लास कॅटेगरीत येतात. तर 5 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं Z क्लास कॅटेगरीत मोडतात. जेव्हा महागाई भत्ता बेसिक पे च्या 50 टक्के होईल तेव्हा घरभाडे भत्ता हा जास्तीत जास्त 30 टक्केच होऊ शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)