7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'गूड न्यूजचा' डबल धमाका, 'या' कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 212% पर्यंत वाढवला; घ्या जाणून

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बहुप्रतिक्षित 04% वेतनवाढ मिळाल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. पाचव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (Dearness Allowance) वाढ करण्यात आली आहे.

Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीत यंदा 'गूड न्यूज'चा डबल धमाका पाहायला मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बहुप्रतिक्षित 04% वेतनवाढ मिळाल्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. पाचव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (Dearness Allowance) वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने (Department of Expenditure) 12 ऑक्टोबर रोजी याबाबतचा निर्णय घेतला. केंद्राने याबाबत एक निवदेनही प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांच्या डीएमध्ये वाढ केली करण्यात आली आहे. जे कर्मचाऱ्यांचा पगार 6 व्या वेतन आयोगाअंतर्गत काढला जातो त्यांच्यासाठी ही वाढ लागू राहील. प्राप्त माहितीनुसार सुधारित DA 1 जुलै 2022 पासून लागू होईल.

दरम्यान, केंद्राने 5 व्या वेतनाखालील कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या 381 टक्क्यांवरून 396 % केला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, डीएचा नवीन दर 1 जुलै 2022 पासून लागू होईल.केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डीए मूळ वेतनावर मोजला जातो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 43,000 रुपये असेल आणि कर्मचारी 6 व्या वेतन आयोगानुसार पगार घेत असेल. आणि अशा स्थितीत केंद्राने डीए 212 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याला 4 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच त्या कर्मचार्‍यांला3,870 रुपयांची वाढ मिळणार आहे. ही वाढ पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू असेल. (हेही वाचा, 7th Pay Commission: महागाई भत्ता वाढण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सरकारने बदलला 'हा' नियम)

दरम्यान, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. केंद्राने 28 सप्टेंबर 2022 रोजी 4 टक्के डीए वाढीची घोषणा केली आहे.