7th Pay Commission Latest News Today: केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 28%; पहा त्यामुळे पगारात नेमकी कशी वाढ होणार?

म्हणजेच जुलै 2021 पासून बेसिकच्या 11%अधिक पगार मिळणार आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

केंद्र सरकारने आज लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाई भत्त्यामध्ये 11% वाढ दिली आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission), आता एकूण 28% डीए (DA) त्यांना लागू होणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी फ्रीझ करण्यात आलेला मागील 3 हफ्त्यांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने सार्‍यांचा डीए 17% वरून 28% केला आहे. परिणामी आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या टेक होम सॅलरी मध्ये वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, सध्या केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 17% आहे. मागील वर्षी त्यामध्ये 4% वाढ करून तो 21% करण्यात आला होता. हा 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. जून 2020 मध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 मध्ये पुन्हा 4% वाढ देण्यात आली आहे. पण त्यांना लागू करण्यात आले नव्हते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही डीए वाढ फ्रीझ करण्यात आली होती. (नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन धारकंना आता SMS, WhatsApp द्वारा मिळू शकणार Monthly Pension Slip).

आता डीए वाढ पुन्हा सुरळीत केल्यानंतर सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात कसा होणार बदल?

केंद्र सरकारने डीए वाढ पुन्हा सुरळीत केल्याने आता ती 28% पर्यंत पोहचली आहे. तर महिन्याला आता 11% वाढ होणार आहे. त्यामुळे बेसिक पगारात आता 11% वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या पगाराच्या गणितानुसार, जर कर्मचार्‍याचा बेसिक पगार 20,000 असेल तर त्याच्यावर 11% वाढ ही डीए मध्ये दिली जाईल. म्हणजे 20,000 चे 11% म्हणजे 2200 रूपये अधिक मिळणार आहेत.

डीए रिस्टोअर केल्यानंतर आता कर्मचार्‍यांचा एकूण डीए 28% झाला आहे. म्हणजेच जुलै 2021 पासून बेसिकच्या 11%अधिक पगार मिळणार आहे. अशी माहिती कर्मचार्‍यांच्या वतीने सरकार सोबत बोलणी करणार्‍या शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif