Vehicle Falls Into Canal In Haryana Kaithal: हरियाणाच्या कैथलमध्ये वाहन कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त शोक

या अपघातात चालक बचावला मात्र गाडीतील इतर सात जण बुडाले. अद्याप, 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - File Image)

Vehicle Falls Into Canal In Haryana Kaithal: हरियाणातील (Haryana) कैथल (Kaithal) मध्ये कार कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला. कालव्यात कार बुडून एकाच कुटुंबातील तीन महिला आणि चार मुलींना आपला जीव गमवावा लागला. गाडीत एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश होता. दसऱ्याला होणाऱ्या बाबा राजपुरीच्या जत्रेसाठी हे कुटुंबिय जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार मुंद्री गावाजवळील कालव्यात पडली. या अपघातात चालक बचावला मात्र गाडीतील इतर सात जण बुडाले. अद्याप, 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा -Tamil Nadu Train Accident: म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस मालगाडीला कशी धडकली? समोर आले खरे कारण? वाचा)

कालव्यात कार पडल्याने मृत्यू झालेल्या सात जणांची ओळख पटली आहे. 50 वर्षीय सतविंदर, 65 वर्षीय चमेली, 45 वर्षीय तीजो, 16 वर्षीय फिजा, 10 वर्षीय वंदना, 10 वर्षीय रिया आणि 6 वर्षीय रमणदीप अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कैथलमधील डीग गावचे रहिवासी होते. (हेही वाचा - Mysuru-Darbhanga 12578 Express Accident: तामिळनाडूमध्ये मोठा रेल्वे अपघात; म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक, डबे रुळावरून घसरले (Watch Video))

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी कैथलमधील घटनेचे वर्णन हृदयद्रावक असे केले आहे. पीएम मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी शक्य ती सर्व मदत पुरवण्यात गुंतले आहे.

त्याचवेळी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भैडोलीजवळ हा अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर खोदलेल्या खड्ड्यात कार पडली. कार चालकाला खड्डा दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.