16 मार्च रोजी निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवर सुनावणी; 7 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

08 Mar, 04:33 (IST)

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने दाखल केलेल्या याचिकेवर, 16 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. मुकेश सिंह याने  माजी वकिलाविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.

08 Mar, 03:36 (IST)

मीडिया वन टीव्ही चॅनेल आणि एशियानेट न्युज टीव्ही चॅनेलच्या कोणत्याही प्रकारच्या प्रसारणासाठी घातलेली बंदी ही, चुकून घातली गेली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्य केले आहे. मंत्रालयाकडून काही भागात गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यास, योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

08 Mar, 02:58 (IST)

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत 690 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. शस्त्र कायद्यांतर्गत 48 गुन्हे दाखल आहेत व एकूण 2193 लोकांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे.

 

08 Mar, 02:22 (IST)

जम्मू-काश्मीर सरकारच्या  शालेय शिक्षण संचालनालयाने जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमधील प्राथमिक वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीर मध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

08 Mar, 02:00 (IST)

औरंगाबाद -जालना रोडवर धूत हॉस्पिटल समोर भरधाव ट्रकने तीन महिलांना धडक दिल्याने भीह्सणं अपघात घडल्याचे समजत आहे या महिला लग्नाला जाण्यासाठी निघाल्या होत्या या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एकीची परिस्थिती नाजूक आहे. 

 

08 Mar, 01:04 (IST)

नागपूर मधील दिघोरी पुलाजवळ इम्रान सिद्दकी नावाच्या तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून  रफिक नावाच्या गुंडाने गोळ्या चालवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला संपत्तीच्या वादातून झाला असल्याची शक्यता आहे, 

 

08 Mar, 24:08 (IST)

कोरोना व्हायरसची आणखी 2 प्रकरणे लडाख मध्ये तर आणि 1 प्रकरण तामिळनाडू मध्ये आढळून आले आहे, सोबतच कोरोना व्हायरसची भारतातील एकूण संख्या 34 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे  विशेष सचिव संजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

07 Mar, 23:23 (IST)

दिल्ली-जयपूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग आज कोसळला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 

 

07 Mar, 23:00 (IST)

शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

 

07 Mar, 21:50 (IST)

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासमवेत राम लल्लाचे दर्शन घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता ते हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

 

07 Mar, 21:35 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्याच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरेदेखील आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 

 

07 Mar, 21:21 (IST)

राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठींबा असल्याचे   ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

07 Mar, 20:24 (IST)

हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाने शिवसेनेला सवाल केला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, आम्ही भाजपपासून वेगळे झालो हिंदूत्वापासून नाही, असं म्हटलं. परंतु, यावर भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून सवाल केला आहे.


 

07 Mar, 20:01 (IST)

भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, आम्ही भाजपपासून वेगळे झालो हिंदूत्वापासून नाही, असं मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

07 Mar, 19:58 (IST)

महाराष्ट्रातील रामभक्तासाठी अयोध्येत भवन निर्मितीचा मानस, असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

 

07 Mar, 19:55 (IST)

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषणा केली आहे. 

07 Mar, 19:49 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्याला आले आहेत. दिड वर्षात उद्धव ठाकरे तिन वेळा अयोध्येला आले आहेत. 

 

07 Mar, 19:17 (IST)

महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाऊन  रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत उत्तर प्रदेश पोलिसांनी  स्वागत केलं आहे.  ट्वीट-

 

07 Mar, 18:57 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मोठी घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार आहेत. 

 

07 Mar, 18:41 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत दाखल झाले आहे. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून मानवंदना देण्यात येत आहेत. शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात येत आहे. 

 

Read more


आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार आहेत. अयोध्यत गेल्यानंतर ठाकरे राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. मात्र या दौर्‍यावरही कोरोना विषाणूचे सावट दिसून येत आहे. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे शरयू आरती करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

आजचा दिवस महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा आहे. आज महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. विरोधी पक्षांनी केलेल्या वेगवेगळ्या दावे आता फोल ठरले आहेत. आज शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर याच पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे. नवं सरकार शंभर तासही चालणार नाही असे दावे जे ‘ऐंशी तास’वाले करीत होते, त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसांत बरेच काही करून आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होती त्यांचे रूपांतर विश्वासाच्या किरणांत करण्याची किमया ‘ठाकरे सरकार’ने शंभर दिवसांत केली, असे म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधला आहे.

काही सरकारे फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरूपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसांत महाराष्ट्रात फाटलेच आहेत, अशी टीकाही सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

तसेच जागतिक पातळीवर थैमान घातलेल्या जीवघेण्या विषाणूमुळे अनेकांचा बळी गेला आहे. भारतातही करोनाचे रुग्ण आढळल्याने मास्कच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मास्कची साठेबाजी होऊ नये, यासाठी औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नयेत, असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने दिले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now