भारतात कोविड-19 च्या एकूण 66 लाखांहून अधिक सॅपल टेस्ट तर मागील 24 तासांत 1,89,869 नागरिकांची चाचणी- ICMR

तर मागील 24 तासांत एकूण 1 लाख 89 हजार 869 सॅपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती ICMR ने दिली आहे.

COVID 19 Testing (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटाने संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 95 हजाराहून अधिक झाली आहे. तर मागील 24 तासांत 14516 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच कोविड-19 च्या चाचण्यांचेही प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशात 19 जून पर्यंत तब्बल 66 लाख 16 हजार 496 कोविड-19 च्या चाचण्या करण्यात आल्या. तर मागील 24 तासांत एकूण 1 लाख 89 हजार 869 सॅपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. (भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर)

ANI Tweet:

देशांतील मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून यापूर्वी दररोज 4-5 हजार सॅपल टेस्ट केल्या जात होत्या. त्यांची संख्या आता 9 हजारांवर आणण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईतही कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून कोरोनाचा पॉझिटीव्ह रिपोर्ट रुग्णाला देण्यापूर्वी देण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.

देशात कोरोना बाधितांचा आकडा 395048 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये 168269 जणांवर उपचार सुरू असून 213831 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 12948 जणांचा कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif