Chhattisgarh News: छत्तीसगडमध्ये ट्रायल रन दरम्यान वंदे भारतावर दगडफेक करणाऱ्या 5 जणांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रेन सुरू होणार आहे. माज्ञ, त्या आधीच एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली शनिवारी पाच जणांना अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्ग-विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री विशाखापट्टणमहून दुर्गकडे परतीच्या मार्गावर असताना आणि बागबहरा रेल्वे स्थानकावरून जात असताना ही घटना घडली. या ट्रेनला 16 सप्टेंबरला दुर्ग येथून हिरवा झेंडा दाखवून नियमित धावणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा - )
पाहा पोस्ट-
हल्ल्यामुळे ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्यांचे नुकसान झाले: C2-10, C4-1 आणि C9-78. या घटनेनंतर, रेल्वे पोलीस दलाने (RPF) शिवकुमार बघेल, देवेंद्र चंद्राकर, जीतू तांडी, लेखराज सोनवणी आणि अर्जुन यादव या पाच जणांना अटक केली. त्यांच्यावर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 153 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले असून लवकरच त्यांना रायपूर रेल्वे न्यायालयात हजर केले जाईल. महत्तावाचे म्हणजे बघेल यांची मेहुणी बागबहरा येथील काँग्रेस नगरसेविका आहे.