Delhi-Bengaluru IndiGo Flight मध्ये दारूच्या नशेत प्रवाशाचा Emergency Door Flap उघडण्याचा प्रयत्न; सुदैवाने कोणतीही दुर्घटना नाही

Delhi-Bengaluru IndiGo Flight मध्ये 40 वर्षीय प्रवाशाला चालू विमानात Emergency Door Flap उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

Delhi-Bengaluru IndiGo Flight मध्ये 40 वर्षीय प्रवाशाला चालू विमानात Emergency Door Flap उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इंडिगो (IndiGo) कडून त्याचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. हा प्रकार शुक्रवार 7 एप्रिल दिवशी 6E 308 या इंडिगोच्या फ्लाईट मध्ये सकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी घडला आहे.

इंडिगो कडून माहिती देताना एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेमध्ये असताना दिल्ली मधून बेंगलूरू कडे झेपावणार्‍या 6E 308 विमानामध्ये अचानक इमरजंसी एक्झिट चा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार लक्षात येताच विमानाच्या क्रु मेंबर कडून तातडीने कॅप्टनला कळवण्यात आले. प्रवाशांनाही सावध करण्यात आले. दरम्यान या घटनेमध्ये कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. असे एअरलाईन्स कडून सांगण्यात आले आहे. विमान बेंगलूरू मध्ये लॅन्ड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला CISF कडे ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान मागील काही महिन्यांपासून विमानामध्ये अशा अप्रिय घटनांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. काही प्रवाशांकडून सहप्रवाशांवर लघूशंका केल्याच्या किळसवाण्या घटना देखील समोर आल्या आहेत. एअरइंडिया कडून अशाच एका घटनेनंतर विमानात दिल्या जाणार्‍या मद्याच्या पॉलिसीमध्येही काही बदल जाहीर करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये फ्लाइटमध्ये गोंधळ घातल्याबद्दल सहा जणांना अटक करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत बेकायदेशीर प्रवासी घटनांमध्ये आतापर्यंत आठ अटक झाली आहेत. नक्की वाचा: प्रवाशाने उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा, Indigo Flight मध्ये उडाला गोंधळ.

मार्चच्या अखेरीस, दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमधील दोन प्रवाशांनी क्रूच्या अनेक इशाऱ्यांना न जुमानता विमानात दारू पिऊन धिंगाणा घातला होता  त्यानंतर क्रू आणि सहप्रवाशांना  शिवीगाळ केली होती.