जम्मू-कश्मीर येथील चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'च्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीर येथील पुलवामा परिसरातील लस्सीपोरा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) परिसरातील लस्सीपोरा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. लस्सीपोरा परिसरात दहशतावादी लपून बसल्याची खबर सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांनवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार दहशतवादी मारले गेले. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके 47, एक एसएलआर, एक पिस्तुल आणि दारु गोळा ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या सोमवारपासून भारतीय सेनेने पुलवामातील 20 गावात सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. यात राष्ट्रीय रायफल्सचे जवान, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी (SOG) आणि सीआरपीएफ (CRPF) यांनी सहभाग घेतला आहे.
ANI ट्विट:
तीन दिवसांपूर्वीही बडगाम येथे झालेल्या चकमकीत जैश- ए- मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.