पुणे जिल्ह्यात आज 369 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 7012 वर; 28 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याचा रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहून काही क्षेत्रात लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात आज 369 कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले, तर कोरोना संक्रमित 10 जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 7012 इतकी आहे. त्यातील आतापर्यंत 310 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे ऑक्टोबरमध्ये नॅशनल गेम्स 2020 चे आयोजन करणे शक्य नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. ते भारतीय क्रीडा मंत्रालयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी आढावा घेण्यासाठी आणि नवीन तारखांचा निर्णय घेण्यासाठी पत्र लिहिणार आहेत.
कोरना व्हायरस संकटासोबत महाराष्ट्रात आलेले टोळधाडीचे संकट आव्हान बनले आहे. टोळधाड अवघ्या पिकासाठीच मारक असल्याने शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी टोळधाड परतवून लावण्यासाठी वाद्यांचा वापर केला. शेतकऱ्यांनी ढोलताशे वाजवत तर प्रशासनाने जंतुनाशक फवारत टोळधाडीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
नागपूर येथील रेड झोन असलेल्या मोमीनपुरा भागातील स्थानिकांनी आज परिसरातील रस्ते पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. यावेळी सर्व प्रकारच्या सामाजिक अंतराच्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले होते.
मुंबईत आज कोरोना व्हायरसच्या 1438 रुग्णांची व 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात आज 763 लोक या आजारातून बरे झाले आहेत. अशा प्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 35,273 झाली आहे.
पुणे येथील आयएमडी शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. 30 मे पासून मान्सूनपूर्व गोष्टी पूर्ण करण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
राज्यात आज 2598 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 59546 अशी झाली आहे. आज नवीन 698 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18616 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 38939 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 38 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या 1 हजार 398 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 867 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश मधील कानपूरमध्ये प्रतिस्पर्धी गटात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले असून पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
स्थलांतरित कामगारांकडून बस किंवा ट्रेनचे भाडे न घेण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. तसेच राज्याने त्यांच्या खाण्याची सोय करावी. त्याचसोबत रेल्वेने स्थलांतरितांना खाण आणि पिण्याच्या पाण्याची ट्रेनमध्ये सोय करावी असे स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलीसांवर हल्ल्याच्या 254 घटना, 86 जखमी, 833 जणांना अटक झाल्याची माहिती आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान पोलिस हेल्पलाईनवर तक्रारीचे फोन सारखे येत आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याचा रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहून काही क्षेत्रात लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहे. तर येत्या 31 मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपणार आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाउन पुढे वाढणार की नाही या बाबतच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्र सरकाराच्या हाताबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधक वारंवार राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. मंगळवारी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच शिक्षण विभागाने शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अमेरिकेत ही कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तेथे कोरोनाच्या रुग्णांसह बळींचा आकडा आता 1 लाखांच्या पार गेला आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक जणांचा बळी गेल्याचा असल्याचे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी म्हटले आहे. तर याबाबत एफपी न्यूज ऐजंसी यांनी बातमी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)