ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांनी भाजपला फटकारले आहे. भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाविरोधात नव्हे तर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे. भाजपने आम आदमी पक्षाविरोधात आंदोलन करायला निमंत्रण द्यावे हे दुर्दौवी असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवले होते. या पक्षात, तुम्ही दिल्लीत येऊन ‘आप’ पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठवायला हवा. त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करायला हवे अशी भावना व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सचिन अहिर, अशोक धात्रक, सुनील तटकरे, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुभेदार या नेत्यांना उद्या शिवडी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. दोन वर्षापूर्वी मुंबईत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 11 नेत्यांवर उद्या कोर्टात दोषारोप पत्रं दाखल करण्यात येणार आहे.
मुंबईत 1217 नव्या रुग्णांसह शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,42,099 वर पोहोचली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तर 30 नवे रुग्ण दगावल्याचेही सांगण्यात येत आहे.
विधानसभेत भेटलेल्या दोन आमदारांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे ते सात दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.
झांशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय व प्रशासन इमारतींचे उद्घाटन उद्या 12.30 वाजता होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी भावना व्यक्त केली आहे की, शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि शेती तसेच पुढील शेतकरी हिताचे संशोधन करण्यात मदत होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील व्यायाम करणारे नागरिक आणि जिम चालक, मालकांना दिलासादायक संकेत मिळाले आहेत. जिम सुरु करण्याबाबत राज्य सरकार अनुकुल आहे. मात्र, कोरोना व्हायरस संक्रमन वाढू नये. यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे सादर करावीत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांना केल्या आहेत. राज्यातील जिम चालक, मालकांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना आणि संकेत दिले.
शशी थरुर हे काँग्रेस पक्षात काँग्रेस कलाकारासारखे आहेत.ते काँग्रेसमध्ये पाहुण्यासारखे 2009 मध्ये आले आणि पाहुण्या कलाकारासारखेच राहिले. ते जागतीक व्यक्तिमत्व असू शकतात. खूप ज्ञानी असू शकतात. परंतू, त्यांच्या कृतींवरुन ते राजकीय अपरीपक्वच असल्याचे सिद्ध होते, अशी टीका के सुरेश यांनी केली आहे. के सुरेश हे काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील व्हीप आहेत.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावली तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव आणि सल्लागार उपस्थित आहेत.
शनिवारी रायगड, पालघर जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे व मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवली आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या नेतृत्व आणि वैयक्तिक बांधिलकीमुळे भारत-जपान भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचे संकट असताना युसीजीकडून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. या संदर्भातील दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. युसीजीच्या 6 जुलैच्या मार्गदर्शक सुचनांनुसार परीक्षा 30 सप्टेंबर घ्याव्यात असे सांगण्यात आले होते. परंतु या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात विद्यार्थ्यांच्या विविध गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा परीक्षासंदर्भात युवासेनेच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेला आता राजकीय दृष्टीकोनातून सुद्धा पाहिले जात आहे.
दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरस बद्दल बोलायचे झाल्यास देशासह महाराष्ट्रात त्याच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या 5,31,563 रुग्णांची प्रकृती सुधारली असून एकूण 23,444 वर पोहचला आहे. त्याचसोबत 1,78,234 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर राज्यात लॉकडाऊन हळूहळू उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोठी धुम पहायला मिळत नाही आहे. परंतु काल राज्यातील विविध ठिकाणी सात दिवसांच्या गणपतींसह गौरींचे सुद्धा विसर्जन करण्यात आले. त्याचसोबत नागरिक या वर्षातील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करताना दिसून येत आहेत. बहुतांश नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलाव किंवा घरच्या घरीच केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)