लातूर जिल्ह्यात लग्नाच्या जेवणातून 200 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा ; 24 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले रहा...

25 Jan, 05:07 (IST)

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील व्यापारी पेठ असलेल्या वाढवणा येथे झालेल्या लग्नात 200 हून अधिक लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

25 Jan, 04:23 (IST)

बॉलिवूडची बहुचर्चित जोडी Varun Dhawan-Natasha Dalal यांचे नुकतेच लग्न झाले असून लग्नानंतर ते मिडियासमोर आले. See Pics

25 Jan, 03:53 (IST)

मुंबईतील आझाद मैदानात आज जवळपास 15,000 शेतकरी दाखल झाले आहेत आणि उद्या आणखी येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे नेते ए नवले यांनी दिली आहे.

25 Jan, 03:43 (IST)

झारखंडमध्ये आज दिवसभरात 109 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 1,16,402 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

25 Jan, 03:35 (IST)

हिमाचल प्रदेश मध्ये आज कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57,210 वर पोहोचली आहे.

25 Jan, 02:52 (IST)

मुंबईत आज आणखी 429 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट- 

 

25 Jan, 02:14 (IST)

गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि फरिदाबाद येथे हवेची गुणवत्ता खालवली  गेली आहे.

25 Jan, 01:57 (IST)

तेलंगणा मधील  19 जानेवारीला हेल्थवर्कर महिलेला लस दिल्यानंतर आज तिचा मृत्यू झाला आहे.

25 Jan, 01:43 (IST)

देशातील जवळजवळ 16 लाख हेल्थ वर्कर्सला कोरोना लसीच्या मोहिअंतर्गत लस दिली गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

25 Jan, 01:26 (IST)

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar देशातील 32 मुलांना दिला जाणार आहे.

25 Jan, 01:14 (IST)

जम्मू कश्मीर येथे कोरोनाचे आणखी 73 रुग्ण आढळल्याने आकडा 1,24,019 वर पोहचला आहे.

25 Jan, 24:44 (IST)

कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यासाठी नाशिक येथून निघालेले आंदोलक शेतकरी आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

25 Jan, 24:41 (IST)

आम आदमी पक्षातील सर्व आमदार ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देण्यासाठी पंजाब हरियाणा बॉर्डवरील शंभू येथे दाखल होणार आहेत.

25 Jan, 24:28 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 569 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 7 जणांचा बळी गेला आहे.

24 Jan, 23:52 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 6036 रुग्ण आढळले  आहेत.

24 Jan, 23:12 (IST)

कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद सोमवारी इलेक्ट्रॉनिक वर्जन मधील Voter ID कार्ड लॉन्च करणार  आहेत.

24 Jan, 22:50 (IST)

तमिळनाडू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रोड शो ला सुरुवात झाली आहे. 

Video:

24 Jan, 22:27 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जानेवारी रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.

24 Jan, 21:55 (IST)

दिल्लीः एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि रिपब्लिकडे परेडमध्ये भाग घेत असलेल्या कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थित होते.

24 Jan, 21:16 (IST)

30,000 रुपयांच्या लाच प्रकरणात मदुराई येथील  प्रादेशिक कामगार आयुक्तासह एका व्यक्तीस CBI कडून अटक करण्यात आली आहे.

Read more


देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत इतर देशांनाही लसीचा पुरवठा करत आहे. कोविड-19 संकटात भारताने केलेल्या सहकार्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

देशात थंडीची लाट पसरली असून अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत पुढील काही आठवड्यात पारा 4 अंशावर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही थंडीचे प्रमाण वाढले असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही सकाळच्या वेळेस गारवा जाणवत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून धाडसत्र सुरु आहे. ड्रग पेडलर चिंकू पठाण याला अटक केल्यानंतर आता जुहू मधील काही ठिकाणी एनसीबी छापे टाकणार आहे. दरम्यान, मुंबईमधील ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर अनेकजण एनसीबीच्या रडारावर आहेत. यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement