आसाम येथे कोरोनाचे आणखी 701 रुग्ण आढळले असून 1664 जणांना दिला डिस्चार्ज; 21 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टीली मराठी सह जोडलेले रहा....

22 Oct, 04:44 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 701 रुग्ण आढळले असून 1664 जणांना  डिस्चार्ज दिला गेला आहे.

22 Oct, 04:38 (IST)

हरियाणा येथे 5 जणांकडून बंदूकीचा धाक दाखवत तब्बल 7 लाख रुपायांची रोकड पंजाब नॅशनल बँकेतून लुटली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Video:

22 Oct, 04:21 (IST)

दिल्ली: केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) डिझाइन केलेले भारतातील पहिले खादी फॅब्रिक पादत्राणे बाजारात आणले.

22 Oct, 04:03 (IST)

IPL 2020: अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला.

 

22 Oct, 03:22 (IST)

आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,609 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 2,45,871 झाली आहे. आज शहरामध्ये 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या 9,869 वर पोहोचली आहे.

22 Oct, 02:50 (IST)

सीबीआयला राज्यातील खटल्यांच्या चौकशीसाठी देण्यात आलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने मागे घेतली आणि केंद्रीय एजन्सीला तपासाच्या उद्देशाने राज्य हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

22 Oct, 02:21 (IST)

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 105 रुग्ण आढळले असून दोन जणांचा बळी गेला आहे.

22 Oct, 01:52 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8142 रुग्ण आढळले असून 180 जणांचा बळी गेला आहे.

22 Oct, 01:49 (IST)

कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई पोलिसांनी समन्स धाडले असून त्यांना येत्या 26-27 ऑक्टोंबरला चौकशीसाठी अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे लागणार आहे.

22 Oct, 01:33 (IST)

India-US 2+2 Ministerial Dialogue येत्या 27 ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आल्याची परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.

22 Oct, 01:20 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 499  रुग्ण आढळले असून 23 जणांचा बळी गेला आहे.

22 Oct, 01:00 (IST)

बिहार विधानसभा निवडणूकीसाठी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते उद्या पटना येथे भाजपचा Manifesto जाहीर केला जाणार आहे.

22 Oct, 24:46 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1137 रुग्ण आढळले असून 9 जणांचा बळी गेला आहे.

22 Oct, 24:30 (IST)

जम्मू-कश्मीर येथे कोरोनाचे आणखी 624 रुग्ण आढळले आहेत.

22 Oct, 24:12 (IST)

मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे.

22 Oct, 24:12 (IST)

मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे.

21 Oct, 23:58 (IST)

पुणे शहरात आज एकाच दिवसात 3 हजार 581 नमुने घेण्यात आली असून शहराची एकूण टेस्ट संख्या 8 लाख 10 हजार 011 वर पोहचली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

21 Oct, 23:31 (IST)

पुणे येथे पोलिसांकडून Mephedrone Drug चे उत्पादन आणि विक्री करणारी बायोटेक कंपनी केली सील असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

21 Oct, 23:29 (IST)

पश्चिम रेल्वेकडून महिलांसाठी आखणी 4 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार  आहेत.

21 Oct, 23:13 (IST)

देशात कोविडच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 88.81टक्क्यांवर पोहचला आहे.

Read more


कोरोना व्हायरसचे संकट कायम असले तरी त्यावर नियंत्रण मिळण्यात काही प्रमाणात राज्य सरकारला यश येत आहे. दरम्यान, अनलॉक 5 ला सुरुवात झाली असून त्याअंतर्गत आजपासून लोकल सेवा सर्व महिलांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी खुल्या असलेल्या मुंबई लोकलमधून सर्वसामान्य महिलाही प्रवास करु शकणार आहेत. लवकरच रेल्वेने सर्वांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. यासाठी आज राज्य आणि रेल्वे सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे.

लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना व्हायरस नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना संबोधित करताना म्हटले आहे. कालच्या अपडेटनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 75,97,064 वर पोहचला आहे. त्यापैकी 67,33,328 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 7,48,538 सक्रीय रुग्ण आहेत. तर 1,15,197 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आज 21 ऑक्टोबर म्हणजेच भारतीय शहीद पोलिस स्मृती दिन. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलिस स्मारकला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now