राजस्थान: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्हा मुख्यालयांमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 दरम्यान कर्फ्यू लागू; 21 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

22 Nov, 05:13 (IST)

राजस्थान सरकारने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भिलवारा या आठ जिल्हा मुख्यालयांमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 दरम्यान रात्री कर्फ्यू लागू केला. तसेच मास्क न घालण्याचा दंड यापूर्वीच्या 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला आहे.

22 Nov, 04:53 (IST)

भारतमातेचे रक्षण करत असताना, राजोरी सेक्टर येथील भ्याड हल्ल्यात दुर्दैवाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे गावचे सुपुत्र कुलदीप जाधव यांना वीरगती प्राप्त झाली, भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली! अशा अशायाचे ट्विट भाजप महाराष्ट्राने आपल्या ट्विटरवर हॅंडलवरून केले आहे. ट्विट-

 

22 Nov, 04:36 (IST)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरुण गोगोई यांची प्रकृती काही अवयव निकामी होण्याव्यतिरिक्त पोस्ट-कोविड गुंतागुंतमुळे शनिवारी खालावली. आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली.

22 Nov, 04:14 (IST)

भारतीय नौदलाला मिळाले पहिले हेवीवेट टॉर्पेडो Varunastra. आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका समारंभात संरक्षण आणि संशोधन विभाग सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांच्या हस्ते त्याला हिरवा कंदील दाखवला गेला. भारत डायनॅमिक्स लिमिटेडने ही माहिती दिली आहे.

22 Nov, 03:14 (IST)

राजधानी दिल्लीत आज कोरोना विषाणूच्या 5,879 रुग्णांची व 111 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह इथली एकूण रुग्ण संख्या 5.23 लाखावर पोहोचली आहे.

22 Nov, 02:43 (IST)

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 1092 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आज 1053 रुग्ण बरे झाले आहेत तर 17 मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या  2,74,572 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,51,509 रुग्ण बरे झाले असून, 10,654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्सया शहरात 9,325 सक्रीय रुग्ण आहेत.

22 Nov, 02:21 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5760 रुग्ण आढळले असून  62 जणांचा बळी गेला आहे.

22 Nov, 02:10 (IST)

हिमाचल प्रदेश: कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शिमला जिल्हाधिकाऱ्यांकडून SOP जाहीर करण्यात आल्या आहेत.

22 Nov, 01:50 (IST)

मुंबईतील नायर रुग्णालयाच्या OPD  इमारती मध्ये आग विझवण्यात यश आले  असून जीवितहानी झालेली नाही.

22 Nov, 01:34 (IST)

जम्मू-कश्मीर येथे LOC वर पाकिस्तान कडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

22 Nov, 01:25 (IST)

मणिपूर येथे कोरोनाचे आणखी 270 रुग्ण आढळले असून एकाचा बळी  गेला आहे.

22 Nov, 24:57 (IST)

पुणे गुन्हे शाखेकडून 37 किलोचा गंजा जप्त करत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

22 Nov, 24:44 (IST)

COVAXIN ची चाचणी तिसऱ्या टप्प्यात यशस्वी झाल्यास 1 हजार जणांपैकी 50 टक्के जणांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. ई. व्यंकट राव यांनी म्हटले आहे.

22 Nov, 24:28 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1515 रुग्ण आढळले असून 9 जणांचा बळी गेला आहे.

22 Nov, 24:08 (IST)

Durg Case: कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या प्रोडक्शन ऑफिस आणि घरातून 86.5 ग्रॅम गांजा NCB कडून जप्त करण्यात आले आहे.

21 Nov, 23:59 (IST)

पुण्यात शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय 13 डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात निर्णय घेतल्याचेमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी  म्हटले आहे.

21 Nov, 23:41 (IST)

केरळात कोरोनाचे आणखी 5772 रुग्ण आढळले असून 25 जणांचा बळी गेला आहे.

21 Nov, 23:29 (IST)

पुलवामा मधील Rambiara Nalla येथे जाण्यासाठी पोलिसांनी अडवले असल्याचा मेहबुबा मुफ्ती यांनी आरोप केला आहे.

21 Nov, 23:21 (IST)

आम्ही भाजप सोब युती कामय ठेवणार असे तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री O Panneerselvam यांनी म्हटले आहे.

21 Nov, 23:08 (IST)

आँध्र प्रदेशात कोरोनाचे आणखी 1160 रुग्ण आढळल्याने आकडा 8,61,092 वर पोहचला आहे.

Read more


दिवाळीच्या शेवटच्या दिवसापासून सुरु होणारा छठपूजा पर्वाचा आज शेवटचा दिवस आहे. 18 नोव्हेंबरपासून हा छठपूजा (Chhath Puja 2020) पर्व सुरु झाला असून आज चौथा आणि अखेरचा दिवस आहे. आज संपूर्ण देशभरात छठपूजेचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. लोक पहाटेपासून छठपूजा करताना दिसत आहे. मुंबई (Mumbai), नवी दिल्ली (Navi Delhi), वाराणसी, बिहार, प्रयागराज सारख्या अनेक शहरात आज छठपूजेचा उत्साह दिसत आहे. वाराणसी गंगा नदी किनारी लोक एकत्र जमत हा उत्सव साजरा करत आहे. तर बिहारमध्येही पाटणा कॉलेज घाट जवळ हा उत्सव साजरा करताना दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी देखील घरात छठपूजा साजरी केली.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,68,695 वर पोहोचली असून काल दिवसभरात 5460 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर काल दिवसभरात 6945 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर मुंबईत कोरोनाचे आणखी 1031 रुग्ण आढळले असून 13 जणांचा बळी गेला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement