समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरण: न्यायालयाने निकाल राखून ठेवला, आता 14 मार्चला होणार सुनावणी

यात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. या प्रकरणात न्यायालयाने एनआयए आणि बचाव पक्षाचा आपापला जाबाब पूर्ण झाल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या आरोपीची हत्या झाल्याचेही सांगण्यात येते.

स्वामी असीमानंद ( फोटो क्रेडिट- twitter )

2007 Samjhauta Express blast case: पाणीपत येथली दीवाना स्टेशन जवळ 12 वर्षांपूर्वी जालेल्या समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात पंचकूला येथील विशेष रष्ट्रीय तपास एजन्सी (National Investigation Agency) न्यायालय आता 14 मार्च रोजी आपला निर्णय देणार आहे. या प्रकरणातील निर्णय न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. 6 मार्च रोजी या प्रकरणावर ही सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी हे प्रमुख आरोपी होते. या प्रकरणातील एकूण 8 आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

12 वर्षांपूर्वी झालेल्या या बॉम्बस्फोटात 68 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. या प्रकरणात न्यायालयाने एनआयए आणि बचाव पक्षाचा आपापला जाबाब पूर्ण झाल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या आरोपीची हत्या झाल्याचेही सांगण्यात येते. (हेही वाचा, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही आरोपींवरील आरोप निश्चित)

दिल्ली येथून लाहोरला निघालेल्या समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात गाडीच्या डब्यांना आग लागली. यात सुमारे 68 लोक जीवंत जळाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात घटनास्थळवर दो सूटकेस बॉम्ब मिळाले होते. हे बॉम्ब नंतर निकामी करण्यात आले. 20 फेब्रुवारी 2007 मध्ये प्रत्यक्षदर्शिंच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे स्केच जाहीर केले होते. त्यातील दोन लोक हे दिल्ली येथूनच गाडीत बसून आले. दरम्यान, ते मध्येच कोणत्यातरी स्टेशनवर खाली उतरले त्यानंतर गाडीत स्फोट झाले, असे सांगण्या आले होते.