Coronavirus Update: भारतात तुमच्या राज्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी

पाहूया भारतातील आजचे (18 मे) कोरोना संक्रमितांची राज्यनिहाय आकडेवारी

COVID-19 (Photo Credits: IANS)

कोरोनाने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातले असून अनेक देशात मृत्यूचे तांडव सुरु केले आहे. तर भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून 96,000 चा टप्पा गाठला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 5242 रुग्ण आढळले असून आज (18 मे) एकूण संख्या 96,169 वर पोहोचली आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्येत वाढ आहे. तसेच गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3029 इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सद्य स्थितीत 56,316 रुग्णांवर उपचार सुरु असून 36,824 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात अनेक महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, तमिळनाडू राज्यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत 10,000 चा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात असून राज्यात एकूण 33,053 रुग्ण आढळले आहेत. काल दिवसभराता राज्यात कोरोनाचे 2,347 रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,198 वर पोहोचली आहे. तर 7,688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

पाहूया भारतातील आजचे (18 मे) कोरोना संक्रमितांची राज्यनिहाय आकडेवारी

S. No. Name of State / UT Total Confirmed cases* Cured/Discharged/Migrated Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 2407 1456 50
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 101 41 2
5 Bihar 1262 475 8
6 Chandigarh 191 51 3
7 Chhattisgarh 86 59 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 10054 4485 160
10 Goa 29 7 0
11 Gujarat 11379 4499 659
12 Haryana 910 562 14
13 Himachal Pradesh 80 44 3
14 Jammu and Kashmir 1183 575 13
15 Jharkhand 223 113 3
16 Karnataka 1147 509 37
17 Kerala 601 497 4
18 Ladakh 43 24 0
19 Madhya Pradesh 4977 2403 248
20 Maharashtra 33053 7688 1198
21 Manipur 7 2 0
22 Meghalaya 13 11 1
23 Mizoram 1 1 0
24 Odisha 828 220 4
25 Puducherry 13 9 1
26 Punjab 1964 1366 35
27 Rajasthan 5202 2992 131
28 Tamil Nadu 11224 4172 78
29 Telengana 1551 992 34
30 Tripura 167 85 0
31 Uttarakhand 92 52 1
32 Uttar Pradesh 4259 2441 104
33 West Bengal 2677 959 238
Cases being reassigned to states 410
Total number of confirmed cases in India 96169# 36824 3029
*(Including foreign Nationals)
**( more than 70% cases due to comorbidities )
#States wise distribution is subject to further verification and reconciliation
#Our figures are being reconciled with ICMR

अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील इतर देशांप्रमाणे फ्रान्समध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रविवारी (17 मे 2020) पुढे आलेल्या आकडेवारीनुसार फ्रान्समध्ये 483 नव्या मृतांसह एकूण मृतांचा आकडा हा तब्बल 28000 हजारांवर पोहोचला. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केविड 19 संक्रमणामुळे देशातील मृतांचा आकडा 28 हजार 108 इतका झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif