मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 129 रुग्ण आढळले; 18 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या घडामोडी, ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपड्टेस जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले राहा...

19 Jul, 05:14 (IST)

मध्य प्रदेशात आज आणखी 129 रुग्ण आढळले आहेत. ज्यामळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 35 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

19 Jul, 05:02 (IST)

AIIMS कडून सोमवारी स्वदेशी लस कोवाक्सिनची क्लिनिकल चाचणी सुरू होणार आहे.

 

19 Jul, 04:28 (IST)

राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

19 Jul, 04:25 (IST)

फोन टॅपिंगच्या आरोपाबद्दल गृह मंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांकडे अहवाल मागविला आहे.

 

19 Jul, 03:49 (IST)

मणिपूर येथे आज नव्या 91 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 891 वर पोहचली आहे. पीटीआयचे ट्वीट- 

 

19 Jul, 03:08 (IST)

कोरोनाने संपूर्ण भारताला हादरुन सोडले आहे. आता पश्चिम बंगाल येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. पश्चिम बंगाल आज 2 हजार 198 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 40 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पीटीआयचे ट्वीट- 

 

 

19 Jul, 02:09 (IST)

कर्नाटक येथे आणखी 4537 रुग्णांची भर पडली असून 1018 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

19 Jul, 01:45 (IST)

महाराष्ट्रात आज आणखी 8348 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली असून 144 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 3,00,937 वर पोहचला आहे.

19 Jul, 01:42 (IST)

मुंबईत गेल्या 24 तासात  कोरोनाच्या 1152 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 70,492 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती BMC कडून देण्यात आली आहे.

19 Jul, 01:38 (IST)

BESCOM मधील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

19 Jul, 01:16 (IST)

वसई-विरार येथे आज आणखी 292 कोविड19 चे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा बळी गेला आहे.

19 Jul, 01:09 (IST)

पंजाब येथे कोरोनाच्या आणखी 350 रुग्णांची भर पडल्याने आकडा 9,792 वर पोहचला आहे.

19 Jul, 24:51 (IST)

असम येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मोरीगावात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

19 Jul, 24:23 (IST)

तमिळनाडू येथे आणखी 4807 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 88 जणांचा बळी गेला आहे.

19 Jul, 24:12 (IST)

राम मंदिरासाठी भुमिपूजनासाठी येत्या 3 ऑगस्ट किंवा 5 ऑगस्टची तारीख  ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र यांना सांगण्यात आल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

19 Jul, 24:04 (IST)

दिल्लीत आज आणखी 1475 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 1973 जणांची प्रकृती सुधारली आहे.

18 Jul, 23:47 (IST)

केरळात आणखी कोरोनाच्या 539 रुग्णांची भर पडल्याने आकडा 11,659 वर पोहचला आहे.

18 Jul, 23:31 (IST)

उज्जैन मधील महाकाली मंदिरात बाहेरुन येणाऱ्या भाविकांना येत्या सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. कारण या ठिकाणी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा  महत्वाचा निर्णय मंदिर व्यवस्थपकांकडून घेण्यात आला आहे.

18 Jul, 23:10 (IST)

मुंबईतील धारावीत आणखी 6 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

18 Jul, 23:00 (IST)

देहरादून मधील 110 भारतीय जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

Read more


जम्मू काश्मीरच्या शोपियान भागातील अम्शीपोरा येथे आज सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चमकम सुरु झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान ही चकमक अद्याप सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या विविध भागात दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे सीमारेषेवर काहीशी अस्थिरता पाहायला मिळत आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या दोन दिवसीय लडाख दौऱ्यावर आहेत. काल लडाख येथील जवानांची भेट घेतल्यावर आज ते अमरनाथ मंदिरात जावून दर्शन घेणार आहेत. भारत-चीन मध्ये लडाख येथे सीमावादावरुन झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 25 हजार पेक्षा अधिक जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. दरम्यान लसी संदर्भात समोर येणारी सकारात्मक माहिती आशादायी ठरत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement