संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला

मात्र त्याचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) पडला असूनन 491.28 अंकांनी कोसळा आहे.

शेअर बाजार (Photo Credits: File Photo)

आज मोदी सरकार 2 चे पहिले अधिवेशन पार पडले. मात्र त्याचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) पडला असूनन 491.28 अंकांनी कोसळा आहे. तर बीएसई सेनसेक्स 491 अंकांनी कोसळीन 38,960.79 अंकांवर बंद झाला. NSE निफ्टी 11672.15 अंकांवर बंद झाला.

पहिल्याच दिवसाच्या संसदीय अधिवेशनावेळी सेनसेक्स जवळजवळ 50 अंकांनी खाली उतरला आहे. कमकुवत जागतिक धोरण आणि अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वीच गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करत आहेत. त्याचसोबत पावसामुळे सुद्धा सेनसेक्सवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. तर गुंतवणूकदार आता 20 रोजी पार पडणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत.

(Monsoon Session 2019:17 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून; नरेंद्र मोदी यांच्यासह खासदारांच्या शपथविधीला सुरूवात)

गेल्या वर्षात बँकिय वित्तय कंपन्यांमध्ये निश्चिततेची कमी आणि मोठे व्यावसायिक दिवाळखोर झाल्याच्या प्रकारामुळे त्याचा परिणाम गुंतवणूकीवर झाला आहे. तर निफ्टीमध्ये असलेल्या 50 कंपन्यांपैकी 46 कंपन्यांच्या शेअरमध्ये गिरावट दिसून आली आहे.