भारतामध्ये दाखल होणार दक्षिण आफ्रिकेतून अजून 12 चित्ते; IAF Aircraft मधून 18 फेब्रुवारीला होणार आगमन
भारतामध्ये चित्ते आणल्यानंतर त्यांना Kuno National Park मध्ये काही दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.
भारतामधील Cheetah Reintroduction Plan नुसार आता देशात साऊथ आफ्रिकेमधून 12 अजून चित्ते आणले जाणार आहेत. यामध्ये 7 नर आणि 5 मादींचा समावेश आहे. शनिवार, 18 फेब्रुवारी दिवशी सकाळी 10 च्या सुमारास या चित्तांचं ग्वालियार मध्ये आगमन होईल. यासाठी Indian Air Force चं C-17 Globemaster aircraft सज्ज ठेवण्यात आलं आहे. भारतामध्ये Kuno National Park मध्ये त्यांना सोडलं जाणार आहे. या चित्त्याना भारतामध्ये आणण्यासाथी साऊथ आफ्रिकेच्या दिशेने यूपीच्या Hindon Air Base वरून IAF Aircraft निघाली आहेत.
चित्त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी चित्त्यांचे एक्सपर्ट असलेले एक शिष्टमंडळ, प्राण्यांचे डॉक्टर, दोन्ही देशांचे महत्त्वाचे अधिकारी असणार आहेत. भारतामध्ये चित्ते आणल्यानंतर त्यांना Kuno National Park मध्ये काही दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.
पहा ट्वीट
17 सप्टेंबरला 8 चित्त्यांची पहिली तुकडी भारतामध्ये आणण्यात आली होती. Namibia मधून त्यांना Kuno National Park मध्ये सोडण्यात आले होते. या पहिल्या तुकडीमधील 'Sasa'नामक एक चित्ता वगळता बाकी सारे उत्तम स्थितीमध्ये आहेत. पुढील 5 वर्ष दरवर्षी अंदाजे 10-12 चित्ते आणले जाणार आहेत.
"भारतातील Cheetah Reintroduction Plan चे उद्दिष्ट भारतात व्यवहार्य चित्ता मेटा पॉप्युलेशन निर्माण करणे आहे. ज्यामुळे चित्ता एक उत्तम शिकारी म्हणून काम करू शकेल आणि त्याच्या ऐतिहासिक श्रेणीमध्ये चित्ताच्या विस्तारासाठी जागा प्रदान करेल ज्यामुळे त्याच्या जागतिक संवर्धनास हातभार लागेल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी दिली आहे.
भारतीय वाळवंटातील शेवटच्या चित्ताची नोंद 1947 मध्ये झाली होती. जिथे मध्य भारतातील साल (शोरिया रोबस्टा) जंगलात तीन चित्त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. भारतातील चित्ता कमी होण्यामागची मुख्य कारणे म्हणजे जंगलातून मोठ्या प्रमाणावर प्राणी पकडणे, दान आणि खेळाची शिकार करणे आहे. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.