2014-15 मध्ये हाँगकाँगला पाठवला 1,038 कोटी काळा पैसा; CBI ने 51 कंपन्यांना बजावली नोटीस
सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
2014-15 मध्ये हाँगकाँगला (Hong Kongतब्बल 1,038 कोटी रुपयांचा काळा पैसा पाठविल्या कारणाने, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) 51 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल कला आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कंपन्यांनी बँक ऑफ इंडिया (BOI), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) या तीन सरकारी बँकांच्या अज्ञात अधिकाऱ्यांसोबत, संगनमताने हाँगकाँगला 1,038 कोटी रुपयांचा बेहिशेबी काळा पैसा पाठविला असल्याचा आरोप आहे. यातील बहुतेक युनिट्स चेन्नईमधील रहिवासी आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरोला माहिती मिळाली होती की, या बँकांच्या चार शाखांमध्ये एकूण 51 पैकी 48 कंपन्यांची चालू खाती उघडली आहेत.
केवळ बाह्य पतपुरवठा करण्यासाठी हे खाती उघडली होती. त्याद्वारे 1,038.34 कोटी रुपये बाहेर पाठवले गेले. सीबीआयने आरोप केला आहे की, मालाच्या आयातीसाठी आगाऊ पैसे परदेशात पाठविण्यासाठी 24 खात्यांचा वापर केला गेला. त्याअंतर्गत 488.39 कोटी रुपयांची रक्कम डॉलरमध्ये पाठविली गेली. भारतीय पर्यटकांच्या परदेशी भेटींचे निम्मित दाखवून, 549.95 कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यासाठी 27 खाती वापरली जात होती. (हेही वाचा: मोदी सरकारचे मोठे यश; भारताला मिळाली स्विस बँकेत असणाऱ्या खातेदारांची यादी, लवकरच समजणार कोणाकडे आहे Black Money)
स्वित्झर्लंडचे कर अधिकारी अशा व्यक्तींची बँक माहिती भारतीय कर अधिकाऱ्यांना देत आहे, जे कर चुकवून येथून पळून गेले आहेत. कर चुकविण्यासाठी सुरक्षित देशांचा आश्रय घेणाऱ्या कंपन्यांची व लोकांची माहिती भारत आणि स्वित्झर्लंडमधील कर प्राधिकरणाला मिळाली आहे. अशा लोकांनी आपला काळा पैसा स्विस बँकेत ठेवला आहे. स्विस अधिकाऱ्यांनी अशा संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत.