पुणे शहरात आज नव्याने 903 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 737, खासगी 155 आणि ससूनमधील 11 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता 26, 077 इतकी झाली आहे.
मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूचे 1,354 रुग्ण आढळले असून, त्याद्वारे एकूण रुग्णांची संख्या 90,149 झाली आहे. आज एकूण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व एकूण मृत्यू संख्या 5,203 झाली आहे.
आज जगातील कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 1 कोटी 20 लाखावर पोहोचली आहे. गेल्या 6 आठवड्यांत संक्रमणांची प्रकरणे दुप्पट झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल Tedros Adhanom Ghebreyesus यांनी याबाबत माहिती दिली.
राजधानी दिल्लीमध्ये आज 2089 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 1,09,140 वर व मृत्यूंची संख्या 3,300 वर पोहोचली आहे.
पंजाब सरकारकडून 12 वी बोर्डाच्या उर्वरित पेपरची परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना Best Performing Subjects नुसार गुण दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात येत्या 18-23 जुलै दरम्यान मेडिकल स्टोअर्स, डेअरी, हॉस्पिटल्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांना फक्त परवानगी असणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर इन्काऊंटर (Kanpur Encounter) प्रकरणातील मास्टर माईंड विकास दुबे (Vikas Dubey) याचा एन्काउंटर करण्यात उत्तर प्रदेश पोलीस स्पेशल टास्क फोर्स ला यश आले आहेत. कानपूर मध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विकास दुबे याला काल पोलिसांनी उज्जैन येथून ताब्यात घेतले होते. विकास दुबे याला मध्य प्रदेशातून कानपूरला परत आणणारी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची एक गाडी पलटली असता त्याने गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे याचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर
दुसरीकडे, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 10 जुलै 2020 च्या अपडेटनुसार, मागील 24 तासात देशात एकूण 26,506 नवे कोरोनाबाधित आढळले असून 475 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील कोरोना बाधितनचा आकडा आता 7,93,802 इतका झाला असून. यापैकी 2,76,685 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, 4,95,513 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 21,604 जणांचा आजवर कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.वाचा सविस्तर
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील पावसाचा जोर कालपासून काहीसा मंदावला आहे. महाराष्ट्रात व विशेषतः मुंबई मध्ये पाऊस पुढील एक आठवडा अगदी कमी किंवा माध्यम स्वरूपात असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या पाऊस वाहणारे वारे हे उत्तर हिमालयाच्या दिशेने वाहत आहेत.