पुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद

कारण येत्या 1 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे जुने चेकबुक काम करणे बंद करणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

जर तुमचे सुद्धा एखाद्या बँकेत खाते असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 1 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे जुने चेकबुक काम करणे बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे शक्य होणार नाही आहे. 1 ऑक्टोंबर 2021 पासून ओरिंटल बँक, इलाहाबाद बँक आणि युनाइटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक काम करु शकणार नाही आहे. कारण ओरिएंटल आणि युनाइटेड बँकेचे विलिकरण पंजाब नॅशनल बँकेत 1 एप्रिल 2020 रोजी झाले होते. याबद्दलची माहिती पीएनबी कडून देण्यात आली आहे.

पीएनबीने एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 1 ऑक्टोंबर पासून ई-ओबीसी आणि ई-युएनआयचे जुने चेकबुक काम करणार नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने चेकबुक असतील त्यांनी नजीकच्या शाखेत जात नवे चेकबुक घ्यावे. नवे चेकबुक पीएनबीच्या अपडेटेड आयएफएसएसी कोड आणि एमआयसीआरसह येणार आहे.(Aadhaar Card: मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यास 'असे' डाऊनलोड करा आधार कार्ड; फॉलो करा 'या' स्टेप्स)

ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने सुद्धा नव्या चेकबुकसाठी अर्ज करु शकतात. या व्यतिरिक्त इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिगच्या माध्यमातून मिळवू शकतात. तसेच ग्राहकांना चेकच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करण्यास काही समस्या येत असेल तर नवे चेकबुक घेणे जरुरी आहे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक 18001802222 वर फोन करु शकतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif