Red Alert in Gujarat: मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये रेड अलर्ट, उद्या शाळा बंद

ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली

Photo Credit- X

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर हा सुरू आहे. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.. मुख्यमंत्र्यांनी पावसाने प्रभावित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी नवसारी, वलसाड, डांग, पंचमहाल, वडोदरा आणि छोटा उदयपूर या बाधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले.  (हेही वाचा  -  Weather Forecast India: देशभरात मुसळधार पाऊस अपेक्षीत, आयएमडीचा ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, असमसह विविध राज्यांना सतर्कतेचा इशारा)

पाहा पोस्ट -

गुजरातच्या अहमदाबादमध्ये आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते बंद झाले, पूरामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी नोंदवले की शहरात गेल्या 24 तासांत 86 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला, सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत एका दिवसात 3.50 इंच पावसाची भर पडली.

पुढील दोन दिवस आणखी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने गुजरातमधील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शिक्षण विभागाने मंगळवारी सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.