Rajasthan Shocker: लग्नाच्या रात्रीच नवरी पळाली! सासरच्यांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून केले बेशुद्ध; तपासानंतर सत्य घटना झाली उघड

लग्नाच्या रात्री सासरच्या लोकांना अंमली पदार्थ पाजून तिने घरातून पळ काढला. शुक्रवारी रात्री घटना उघडकीस आली.

Marriage (PC - Pixabay)

Rajasthan Shocker: लग्न (Marriage)म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी, सणई-चौघडे, घोडा, वरात, डिजे, सगळीकडे आनंदी-आनंद असे वातावरण असते. सगळे वरापेक्षा नववधूला पाहण्यासाठी उत्सूक असतात. तिला काय हवं? काय नाही? याची काळजी घेतली जाते. ती दुखावली जाणार नाही अशी कोणतीच गोष्ट होतं नाही. त्यानंतर काही दिवसांत नवरा बायकोचा सुखाचा संसार सुरू होतो. मात्र, लग्नाच्या रात्रीच जर वधू पळाली तर? कशी अवस्था असेल वराच्या घरातील मंडळींची..अवघड आहे ना सगळं. अशीच घटना राजस्थानच्या(Rajasthan) बुंदी जिल्ह्यातून समोर आली आहे.

 

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात एका नवविवाहित वधूने तिच्या सासरच्या लोकांना रात्रीच्या जावणात अंमली पदार्थ पाजले आणि घरातून पळ काढला. धारघडी गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. यात मंजुबाई (24) असे पळून गेलेल्या नववधूचे नाव आहे. तिने सासरच्यांसाठी बनवलेल्या जेवणात काहीतरी मिसळले. ज्यामुळे रात्रीचे जेवण केल्यानंतर कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडले, असे सासरच्या मंडळींनी पोलीस जबाबात म्हटले आहे.

जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना ते घरात बेशुद्ध पडलेले आढळले तेव्हा त्यांनी कुटुंबातील सदस्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासात दुर्गाशंकर गुर्जर (24) यांचा मंजुबाईसोबत 23 ऑगस्ट रोजी 'नाता-प्रथा' प्रथेनुसार विवाह झाला होता.

'नाता-प्रथा' प्रथेनुसार विवाह

'नाता प्रथा' अंतर्गत, काही समाजातील मुलींना लग्नाच्या नावाखाली राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून बेकायदेशीर रित्या आणले जाते. काही वेळी या मुलींना कागद पत्रांवर कायदेशीर रित्या व्यवहार केला जातो. अशाच एका घटनेत या महिलेला आणले गेले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, तिचे सासरे बेशुद्ध पडल्यानंतर मंजुबाईंनी तेथे उभ्या असलेल्या मोटारसायकलवरून घरातून पळ काढला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif