पाकिस्तानच्या निशाणावर होते RSS चे काही बडे नेते, हत्येसाठी दिली 4 करोड रुपयांची सुपारी
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

दिल्ली पोलीसांच्या एका विशिष्ठ पथकाने पाकिस्तान (Pakistan) आंतर- सेवा गुप्तचर संचालक मंडळ (Inter-Services Intelligence) साठी काम करणाऱ्या तीन शार्प शूटर्सना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) याचे पदाधिकारी आणि दक्षिण भारतातील दोन बड्या नेत्यांची हत्या करण्यासाठी भारतात पाठविण्यात आले होते. या हत्येसाठी त्यांना चार करोड रुपयांची रक्कम देण्यात आली होती.

तर जवळजवळ 15 लाख रोख रक्कम हत्येपूर्वी आणि हत्याकेल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात येणार असल्याचे सत्य उघडकीस आले आहे. तसेच या व्यक्तींनी बुक केलेल्या हॉटेलमधून चार मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. परंतु सर्व सिमकार्ड हे खोट्या पत्त्याच्या नावाने खरेदी केली होती.

दरम्यान, दीड महिन्याच्या कालावधीनंतर कडेकोट लक्ष ठेवल्यानंतर या आयएसआयसाठी काम करणाऱ्या तिघांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांची ओळख अफगाणिस्तान मधील मजार-ए-शरीफ राहणारा वली मोहम्मद, दिल्लीतील मदनगीर येथील शेख रियाजुद्दीन आणि केरळ मधील कासरगौड राहणारा मुहतासिम सीएम उर्फ थस्लीम अशी ओळख पटली आहे. यामधील मुहतासिम याला केरळ आणि अन्य दोघांना दिल्लीमधून अटक केली आहे. (हेही वाचा-महाराष्ट्रात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होणार? नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना तयारीला लागण्याचे दिले आदेश: सूत्र)

तपासणी वेळी आरोपींनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हत्या करण्याचा कट रचला होता. तसेच पाकिस्तान अंडरवर्ल्ड डॉन रसूल खान याने हॉटेल बुक करण्यासोबत या तिघांच्या मदतीसाठी चार लोकांची नेमणूक केली होती. परंतु रेकी करण्यासाठी हे सर्व जण केरळला रवाना होणार होते आणि रेकी पूर्ण झाल्यावर हत्या करण्याच्या प्रयत्नात होते.

या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टी मधील बडे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरएसएसच्या पदाधिकारी दहशतवाद्यांच्या निशाणावर आहेत.