राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हैदराबाद येथील एन्काऊंटरचा तपास करणार

यामुळे संपूर्ण देशातून संबधित पोलिसांचे कौतूकही करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (National Human Rights Commission) गंभीर दखल घेतली असून लवकरच घटनास्थळी जाऊन एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश आयोगाकडून विशेष तपास पथकाला देण्यात आला आहे

Hyderabad Murder Case (Photo Credits-ANI)

हैदराबाद येथे बलात्कार आणि हत्या करणाऱ्या (Hyderabad Rape And Murder Case) सर्व आरोपींचा पोलिसांनी गुरुवारी रात्री एन्काउंटर केला आहे. यामुळे संपूर्ण देशातून संबधित पोलिसांचे कौतूकही करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (National Human Rights Commission) गंभीर दखल घेतली असून लवकरच घटनास्थळी जाऊन एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश आयोगाकडून विशेष तपास पथकाला देण्यात आला आहे. एवढेच नव्हेतर, याप्रकरणी तपास करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक पथकही तयार केले आहेत. या पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक करणार असून हे तपास पथक लवकरच घटनास्थळी दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. हैदराबाद येथे झालेल्या एन्काऊंटर कसा झाला, याबाबत तपास पथक संपूर्ण अहवाल तयार करुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सोपण्यात येणार आहे.

हैदराबाद येथे घडलेल्या लज्जास्पद कृत्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ निर्माण झाली होती. पंरतु, काही दिवसाच्या आतच हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र आनंद साजरा करण्यात येत आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. यासाठीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून तातडीने हैदराबाद येथे करण्यात आलेल्या एन्काऊंटरचा तपास करण्यात यावा, असा आदेश तपास पथकाला देण्यात आला आहे. हे देखील वाचा- Hyderabad Encounter: स्वसंरक्षणातून पोलिसांना एनकाऊंटर करावा लागला : सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची पत्रकार परिषदेत माहिती

हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये गुरुवारी मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे अवाहन केले. मात्र, ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळीबार करावा लागवा. परिणामी, चौघ आरोपींना ठार करण्यात आले आहे.