Mukesh Ambani : अंबानी की अदानी? कुणाची मुले आहेत जास्त श्रीमंत, फोर्ब्सची आकडेवारी काय सांगते?

मात्र, जशी मुकेश अंबानींना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तशीच गौतमी अदानी यांनीही दोन मुले आहेत. मात्र, ते दोघेही सोशल मिडीयावर नसतात. त्यामुळे अनेकांना अदानी यांच्या मुलासंदर्भात काहीच माहिती नाही.

Photo Credit - Twitter

Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांची ओळख आहे. त्या खालोखाल दुसऱ्या साथानावर गौतम अदानींची (Gautam Adani) ओळख आहे. नीता अंबानी त्यांची मुले आकाश, अनंत आणि इशा नेहमी चर्चेत असतात. परंतु दुसरीकडे भारतातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे मुले प्रसिद्धीपासून दूर असतात. अनेकांना गौतमी अदानी यांच्या मुलासंदर्भात काहीच माहिती नाही. गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांना दोन मुले आहेत. करण अदानी (Karan Adani)आणि जीत अदानी (Jeet Adani)अशी त्यांची नावे असून ते दोघेही सोशल मीडियापासून नेहमी दूर असतात. अदानींचा संपूर्ण परिवार सोशल मीडियापासून लांब आहे.(हेही वाचा: Davos World Economic Forum: अदानी समूहाचे संस्थापक Gautam Adani यांची महाराष्ट्र दालनात भेट; CM Eknath Shinde यांच्यासोबत केली गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा)

फोर्ब्सच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. म्हणजेच ते भारतात श्रीमंतांच्या यादीत पहिले आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 117.5 अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण 84.8 अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी यांचा मुलगा करण यांच्याकडे अदानी पोर्ट्स एंड स्पेशल इकोनॉमिक झोन (APSEZ) ची जबाबदारी आहे. ते या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर (MD) आहे. या कंपनीचे सीईओ ते राहिले आहेत. करण अदानी यांचे शिक्षण अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात झाले. (हेही वाचा: आता अदानी समूह IRCTC ला देणार आव्हान, Gautam Adani रेल्वे क्षेत्रात ठेवणार पाऊल)

करण अदानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये अदानी ग्रुपसोबत मुंद्रा पोर्टमध्ये केली. आत्तापर्यंत करण अदानी याची एकूण संपत्ती पाहिल्यास ती 120 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त आहे. तेच जर मुकेश अंबानींच्या मुलाची संपत्ती पाहिल्यास, आकाश अंबानी यांच्याकडे 3,33,313 कोटींची संपत्ती आहे. गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत सध्या अदानी ग्रुप फायनान्सचा उपाध्यक्ष आहे. अदानी डिजिटल लॅबचे उपाध्यक्ष ते आहे. त्यांची संपत्ती जवळपास करण इतकीच असल्याचे सांगण्यात येत आहे.