Monsoon 2020 Updates: मध्य-नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात आणि महाराष्ट्रासह 'या' भागात साऊथ वेस्ट मान्सून दाखल- IMD
उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, कारण साऊथवेस्ट मान्सूनचे (Southwest Monsoon) राज्यात आगमन झाल्याची माहिती आयएमडी (IMD) यांच्याकडून देण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, कारण साऊथवेस्ट मान्सूनचे (Southwest Monsoon) राज्यात आगमन झाल्याची माहिती आयएमडी (IMD) यांच्याकडून देण्यात आली आहे. तर आयएमडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य-नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात, दादरा-नगर हवेली, महाराष्ट्रातील उर्वरित भागासह मुंबईत सुद्धा साऊथ मान्सूनने एन्ट्री केली आहे. त्याचसोबत मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहार मधील काही भागात ही साऊथ वेस्ट मान्सूनचा प्रभाव दिसून येणार आहे.
शनिवारी हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्याचसोबत शुक्रवारी सुद्धा हवामान खात्याने महाराष्ट्रात लँन्डफॉल झाल्याने पुढील 24 तासात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. देशात विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाबाबत अधिक माहिती दिली जाते.(Monsoon 2020 Updates: साऊथ वेस्ट मान्सून आज महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज)
दरम्यान, आयएमडी यांच्याकडून सोमवार आणि मंगळवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथील आयसोलेटेड परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिमुसळधार ते तुफान पावसाची शक्यता दर्शवली जाते. तर जून 12-23 (8.30-8.30), हलक्या स्वरुपाचा पाऊस 91.3mm) आणि सांताक्रुझ(2.1mm) पडणार असल्याचे ही आयएमडी यांनी म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)