Rahul Gandhi On BJP: मोदी सरकारचं अजून एक आश्वासन ठरलं खोटं, राहुल गांधींची टीका
आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. देश अजूनही लसीपासून दूर आहे. आणखी एक जुमला उध्वस्त झाला.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर (Modi Government) या वर्षाच्या अखेरीस सर्व पात्र लाभार्थ्यांना अँटी-कोविड -19 लसीचा (Covid Vaccine) संपूर्ण डोस देण्याचे वचन पूर्ण न केल्याबद्दल टीका केली. सरकारने जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण पात्र लोकसंख्येला अँटी कोविड-19 लसीचा डोस प्रदान करणे अपेक्षित आहे. गांधी यांनी ट्विट केले, केंद्राने 2021 च्या अखेरीस सर्वांना लसीचे दोन डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. देश अजूनही लसीपासून दूर आहे. आणखी एक जुमला उध्वस्त झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत देशभरात अँटी-कोविड-19 लसीचे 144.67 कोटी डोस देण्यात आले. 84.51 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 60.15 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
18 वर्षांवरील एकूण लाभार्थ्यांची संख्या 94 कोटी आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 48 लाख 38 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 81 हजार 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार लोक बरे झाले आहेत. 5400 कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 82,402 वर पोहोचली आहे. या लोकांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.