Ashwini Vaishnav: मोदी सरकारच्या कार्यकाळात गेल्या 10 वर्षात 91 हजार अधिक नोकऱ्या रेल्वे विभागात उपलब्ध; अश्विनी वैष्णव यांची माहिती
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात गेल्या 10 वर्षात 91 हजार अधिक नोकऱ्या रेल्वे विभागात उपलब्ध झाल्याचे सांगितले. यूपीए सरकारने सन 2004-2014 दरम्यान, 4.11 लाख रोजगार निर्माण केले होते, जे सध्याच्या सरकारपेक्षा कमी आहेत.
Ashwini Vaishnav: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav)यांनी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार सरकारने 2014-2024 कार्यकाळात 5.02 लाख नोकऱ्या रेल्वे विभागात निर्माण केल्या आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार यूपीए सरकारने 2004-2014 4.11 लाख रोजगार निर्माण केले होते. जे सध्याच्या सरकारपेक्षा कमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा: LPG Price Hike: 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 6.5 रुपयांनी वाढली,जाणून घ्या, नवीन दर)
रोजगार निर्मितीबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत 1.1 कोटी उमेदवारांनी आरआरबी परीक्षा दिली. त्यापैकी 1,30,581 उमेदवारांना रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.