Mirzapur Road Accident: मिर्झापूर, यूपी येथे भीषण अपघात, ट्रक आणि ट्रॅक्टरच्या धडकेत 10 मजूर ठार, 3 जखमी

येथे मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला मागून धडकल्याने 10 मजुरांचा मृत्यू झाला. तीन मजूर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताबाबत मिर्झापूरचे एसपी अभिनंदन म्हणाले की, रात्री एक वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा बॉर्डरवर जीटी रोडवर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - File Image)

Mirzapur Road Accident: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील कचवान पोलीस स्टेशन हद्दीतील कटका गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला मागून धडकल्याने 10 मजुरांचा मृत्यू झाला. तीन मजूर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताबाबत मिर्झापूरचे एसपी अभिनंदन म्हणाले की, रात्री एक वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा बॉर्डरवर जीटी रोडवर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. भदोही जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिली. आमची टीम घटनास्थळी पोहोचली, बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र 13 पैकी 10 जणांचा मृत्यू झाला. इतर 3 जखमींना उपचारासाठी बीएचयूमध्ये पाठवण्यात आले आहे. हे देखील वाचा: US Horror: अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी खाल्ले, अंगावर 50 ठिकाणी आढळल्या चावल्याचा खुणा; कोर्टाने वडिलांना सुनावली 16 वर्षांची शिक्षा

 मिर्झापूरमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक 

मृत मजूर भदोही जिल्ह्यातील रहिवासी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व १३ मजूर भदोही जिल्ह्यात मजूर म्हणून काम करायचे.  याप्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif