UP Rape case: मेरठमध्ये 2 शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आरोपी विद्यार्थी फरार

शाळकरी दोन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर घात केला आहे.

Rape case representaional photo

UP Rape case: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात वर्ग संपवून घरी परतत असताना एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार (Rape) केल्याचा घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी 9 वीत शिकणारी विद्यार्थिनी आपल्या घरी परतत होती. जिल्ह्य़ातील रोहता भागात जेव्हा आरोपीने  एक इयत्ता 9वीत आणि दुसरा इयत्ता 12वीत होता, तिला घेरलं - तिला जबरदस्तीने उसाच्या शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी त्यांच्या मुलीचा पाठलाग करत होते.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रोहता पोलिस ठाण्यात कलम 367 डी (गँगरेप) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. रोहता पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर, रवींद्र कुमार सिंग यांनी सांगितले: "तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. सध्या आरोपी फरार असून दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

पीडीला घराच्यांनी रुग्णालयात नेलं आहे सद्या तीच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे शाळेतील वातावरण बिघाडले आहे. लवकरच आरोपी पोलीसांच्या ताब्यात असेल अशी माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.