Telangana Video: मंत्री श्रीदहर बाबू यांच्या ताफ्यातील कारने पोलिस अधिकाऱ्याला दिली धडक, घटनेचा Video व्हायरल
तेलंगणाचे मंत्री डी श्रीदहर बाबू यांच्या ताफ्यातील एका कारने पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली आहे.
Telangana Video: तेलंगणाचे मंत्री डी श्रीदहर बाबू यांच्या ताफ्यातील एका कारने पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, ताफ्याचा इतर वाहनांचा पाठलाग करत येत असताना ही घटना घडली. या धडकेत पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. IPS अधिकारी परितोष पंकज असं अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अपघातात वाहानाची धडक लागल्याने ते जमिनीवर पडले, सुदैवाने कार अंगावरून गेली नाही. या अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- कॅराकलने पहिल्यांदा आरशात पहिल्यानंतर दिली सुंदर प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement