Weather Forecast In India: हवामान विभागाकडून 'या' 5 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. खैरथल जिल्ह्यातही पाच मोर मृतावस्थेत आढळले, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
Weather Forecast In India: भारतीय हवामान विभाग (IMD) ने शुक्रवारी दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणासह अनेक उत्तर आणि उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये 28 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेसाठी (Heat Wave) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. हवामान एजन्सीने केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्यात अडकलेल्या दक्षिणेकडील राज्यात गेल्या 24 तासांत 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने 28 मे पर्यंत दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या बहुतांश भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 26 मे ते 28 मे पर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशसाठी तीव्र उष्णतेची लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पश्चिम मध्य प्रदेशातील वेगळ्या भागांमध्ये 26 मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज)
तथापी, शनिवारी दिल्लीचे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. खैरथल जिल्ह्यातही पाच मोर मृतावस्थेत आढळले, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. (हेही वाचा- देशात उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीसह उत्तर भारताला पुढील 5 दिवसाचा रेड अलर्ट)
आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की त्यांनी राजस्थान आणि हरियाणामध्ये रेड अलर्ट आणि पंजाबमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांत एनसीआर-दिल्लीच्या तापमानात किंचित घट झाली आहे. तथापि, तापमान अजूनही 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे.
आयएमडीचा पावसाचा अंदाज -
हवामान खात्याने म्हटले आहे की, दक्षिण केरळमध्ये चक्रीवादळामुळे 24 मे रोजी केरळ आणि माहेमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. IMD ने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. केरळच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, थ्रिसूरसह प्रमुख शहरांच्या सखल भागात पाणी साचले आहे. त्रिशूरच्या सेंट थॉमस रोड परिसरात झाड पडल्याने वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.