Meerut Shocker: इअरबड घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होते लग्न
जिथे एक मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असतांना तिला ट्रेनने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने कानात इअरबड्स घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता. या मुलीचे 20 दिवसांनी लग्न होणार होते.
Meerut Shocker: उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असतांना तिला ट्रेनने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने कानात इअरबड्स घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता. या मुलीचे 20 दिवसांनी लग्न होणार होते. मात्र या आनंदी वातावरणात मुलीच्या घरी शोककळा पसरली आहे. पारुल असे मृत तरुणीचे नाव आहे. अपघात होताच जीआरपी आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ओळखपत्राच्या आधारे मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. पारुल लग्नाच्या खरेदीनंतर दिल्लीहून परतत असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.