Mann Ki Baat 100th Episode: 'मन की बात' कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी जगभर प्रसारित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील

उल्लेखनीय असे की हा कार्यक्रम पूर्णपणे ध्वनिमुद्रीत म्हणजेच ऑडिओ रुपात असतो. 'मन की बात' कार्यक्रम जगभरात प्रसारित व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janta Party) देखील जोरदार तयारी करत असल्याचे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Mann Ki Baat | (Photo Credits: narendramodi.in)

'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा 100 वा भाग (Mann Ki Baat 100th episode) लवकरच प्रसारित होईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रसारण केवळ भारतच नव्हे तर जगभर प्रसारित करण्याचा विचार सुरु आहे. पतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. उल्लेखनीय असे की हा कार्यक्रम पूर्णपणे ध्वनिमुद्रीत म्हणजेच ऑडिओ रुपात असतो. 'मन की बात' कार्यक्रम जगभरात प्रसारित व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janta Party) देखील जोरदार तयारी करत असल्याचे वृत्त वृत्तसंस्था आयएनएसने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. 100 वा भाग यशस्वी करण्यासाठी भाजप एक लाखांहून अधिक बूथवर प्रसारित करण्याची तयारी करत आहे.

एएनआयने भाजपतील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मन की बात कार्यक्रम मालिकेत ज्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांचा सन्मान केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मालिकेत घेतलेल्या उल्लेखनीय नावांचा त्यांच्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते सन्मान आणि स्वागत केले जाईल. दिल्लीतही या उल्लेखनीय नायकांचे स्वागत करण्याची योजना आखली जात आहे. या सर्वांसह , पंतप्रधान मन की बातचा 100 वा भाग ऐकला जाईल.

भाजपकडूनही या 'मन की बात कार्यक्रमा'ची विशेष तयारी करण्यात येत आहे. सूत्रांकडून समजते आहे की, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 100 ठिकाणी 100 लोक बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' ऐकतील. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे विविध गट आदींचाही यात समावेश असेल. याशिवाय ज्यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशाही काही मंडळींचा कार्यक्रमात समावेश असेल.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम आणि विनोद तावडे हे मन की बात कार्यक्रमाचे प्रभारी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राज्यभर चालवला जात आहे. यासाठी भाजपने संपूर्ण टीम तयार केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif