Manipur Bank Heist Video: मणिपूरमध्ये PNB बँकेतून 18.85 कोटी रुपये चोरी, घटनेचा व्हिडिओ आला समोर
या घटनेमुळे पुन्हा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Manipur Bank Heist Video: मणिपूर राज्यात दिवसेंदिवस हिंसाचार वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान मणिपूर राज्यातील बॅंकेत दरोड्यांनी कोट्यावधी रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे पुन्हा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील उखरुल शहरात दरोड्यांनी पंजाब नॅशनल बॅकेच्या शाखेत धाड टाकली. दरोड्यांनी गुरुवारी बॅकेतून १८.८५ कोटी रुपयांची चोरी केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्तींनी उखरुल शहरातील व्ह्यूलँड-1 येथे असलेल्या पीएनबी बँकेच्या शाखेवर गुरुवारी संध्याकाळच्या वेळीस दरोड्यांनी हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील उखरुल शहरातील पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) शाखेतून गुरुवारी दरोडा टाकला. चोरट्यांनी १८.८५ कोटी रुपयांची लुट केली. अज्ञातांनी चेहऱ्यावर मुखवटा घातलेले होते. सुरक्षा कर्मचारी आणि बॅंक कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकांवर ठेवले होते. काही कर्मचाऱ्यांना एका रुममध्ये बंद केले होते. (हेही वाचा- मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, इंफाळमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या)
एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला बंदुकीच्या जोरावर तिजोरी उघडायला लावली, त्यानंतर दरोडेखोरांनी पैसे लुटले. या प्रकरणी उखरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहेचले. पोलिस या घटनेत कंबर कसून चौकशी करत आहे.