Ludhiana: एका व्यक्तीला पाळीव कुत्र्यासोबत अनैसर्गिक सेक्स करतांना मालकाने रंगेहात पकडले, पुरावा म्हणून व्हिडीओ केला रेकॉर्ड

जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी शिमलापुरी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Wikimedia Commons

Ludhiana: जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी शिमलापुरी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्याच्या मालकाने घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पुरावा म्हणून लुधियाना पोलिसांना दिला. फिर्यादीने सांगितले की, घटनेच्या दिवशी बेपत्ता झालेल्या कुत्र्याचा शोध घेत असताना त्याने आरोपीला त्याच्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवतांना पहिले.  शिमलापुरीच्या प्रीतनगर येथील रोहित कुमार असे आरोपीचे नाव आहे. कुत्र्याचा मालक गुरजीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

“आरोपीला माझ्या पाळीव प्राण्यासोबत अनैसर्गिक सेक्स करताना पाहून मी व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर पोलिसांना बोलावले आणि आरोपीला पकडण्यात आले,”आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक गुन्हे) आणि प्राणी कायद्याच्या कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif